Agriculture news in Marathi, Kadaknath hens left in CM's coffin | Agrowon

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या कडकनाथ कोंबड्या
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी करून आरोपींना तातडीने अटक व शिक्षेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात कडकनाथ कोंबड्या सोडल्या. 

सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी करून आरोपींना तातडीने अटक व शिक्षेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात कडकनाथ कोंबड्या सोडल्या. 

इस्लामपूर-पलूस मार्गावरील घोगाव फाट्यावर पोलिस बंदोबस्ताचा ससेमिरा चुकवत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भारत चौगुले, भागवत जाधव, बाळासाहेब लिंबीकाळे, संदीप शेळके आदी आंदोलकांनी कोबड्या सोडल्या. कार्यकर्त्यांनी या वेळी घोषणाबाजीही केली. विशेष म्हणजे मोठा पोलिस बंदोबस्त, भाजपच्या कार्यकर्त्यांचा वावर असतानाही आंदोलकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. स्वाभिमानीने कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणाची चौकशी आणि आरोपींना अटक करावी, संपूर्ण कर्जमाफी, पूरग्रस्तांना मदत आदी कारणांसाठी आंदोलन केले. 

कडकनाथ कोंबडी फसवणूकप्रकरणी कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीनेही महाजनादेश यात्रेत कोंबड्या सोडण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्याशी चर्चेसाठी वेळ उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतरही आज महाजनादेश यात्रेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या सोडल्या. 
कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा कडकनाथ कोंबडीपालक शेतकरी संघर्ष समितीचाही आरोप आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...