agriculture news in marathi, 'Kadwa' warns of going to court if the ethanol project is set | Page 2 ||| Agrowon

‘कादवा’ने इथेनॉल प्रकल्प रेटल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

लखमापूर, जि. नाशिक :  `कादवा` कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक सभासदांचा असलेला विरोध डावलत इथेनॉल प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाबाबत ऊस उत्पादकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, संचालक मंडळाने चर्चेविना प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ऊस उत्पादक सभासद आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, सचिन बर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

लखमापूर, जि. नाशिक :  `कादवा` कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस उत्पादक सभासदांचा असलेला विरोध डावलत इथेनॉल प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाबाबत ऊस उत्पादकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा, संचालक मंडळाने चर्चेविना प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ऊस उत्पादक सभासद आवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, सचिन बर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बर्डे म्हणाले, ‘‘संचालक मंडळाने इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा जो अट्टाहास चालवला आहे, तो अतिशय चुकीचा व कारखान्याच्या मुळावर उठणारा आहे. प्रकल्पाला विरोध नसून त्याच्या उभारणीसाठी कारखान्याकडे पुरेसा ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध नाही. आधी कार्यक्षेत्रात चार लाख टन ऊस ऊपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यानंतरच हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घ्यावा.``

 ऊस उत्पादकांनी प्रकल्पाला संमती दिल्यास आमचा विरोध राहणार नाही. मात्र विरोध डावलून प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास केल्यास या विरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागू, तेथेही न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा जाधव आणि बर्डे यांनी दिला .

सर्वांना विश्‍वासात घेऊनच  निर्णय : शेटे
`कादवा`चे अध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले,‘‘साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर उद्योग अडचणीत आल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने इथेनॉलबाबत सकारात्मक धोरण अवलंबले आहे. त्यासंबंधीच्या प्रस्तावाचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेवर ठेवत त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यास सर्वानुमते हात उंचावून बहुमताने मंजुरी देण्यात आली. प्रकल्प उभारणीसाठी आवश्‍यक विविध परवानग्यांसाठी बराच कालावधी लागणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे टन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. कारखान्यास सहकार्य करावे.’’

इतर बातम्या
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...