कृषी विभागाने उपलब्ध करून दिले कामगंध सापळे

कृषी विभागाने उपलब्ध करून दिले कामगंध सापळे
कृषी विभागाने उपलब्ध करून दिले कामगंध सापळे

ईट, जि. उस्मानाबाद : यंदा कापसाचे क्षेत्र ईट शिवारात वाढले आहे. गतवर्षीचा बोंड अळीचा उद्रेक लक्षात घेऊन कृषी विभागाने कामगंध सापळे ईट गावासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे बोंड अळीचा उपद्रव रोखण्यास मदत होण्याची आशा आहे.

भूम तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली आहे. गतवर्षी फटका बसला असतानादेखील मोठ्या हिमतीने कापसाची लागवड केली आहे. बोंड अळीचे सावट यंदाच्या हंगामावर कायम आहे. त्याची धास्ती शेतकऱ्यांसह कृषी विभागानेदेखील चांगले मनावर घेतल आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सावध पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ईट शिवारात कापसाचे सहाशे हेक्‍टर एवढे क्षेत्र आहे. त्यासाठी बोंड अळी कीड व रोग व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जात आहेत.

यंदा कृषी विभागाने ईट गावातील १०० हेक्‍टर क्षेत्राची निवड केली आहे. या क्षेत्रासाठी दोन हजार ट्रॅप कृषी विभागाकडून मोफत देण्यात येत आहेत. डोकेवाडी येथील शेतकरी भागवत पवार यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी आधिकारी बी. यू. मंगरूळकर, तालुका कृषी आधिकारी गणेश दुरुंदे, कृषी सहायक अण्णासाहेब खटाळ, जीवन राऊत, माजी उपसरपंच किसन आहेर, अशोक खरवडे, विजय शेजाळ, सचिन थोरात आदींची या वेळी उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com