agriculture news in Marathi, Kalamna Bajar in Improvement at tur price | Agrowon

कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

नागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक वाढण्यासोबतच दरातही काही अंशी तेजीचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला. गेल्या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५२५० क्‍विंटल होते. या आठवड्यात ते ५३५२ रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. 

नागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक वाढण्यासोबतच दरातही काही अंशी तेजीचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला. गेल्या आठवड्यात तुरीचे दर ४६०० ते ५२५० क्‍विंटल होते. या आठवड्यात ते ५३५२ रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. 

बाजार समितीत तुरीची आवक सरासरी १५०० क्‍विंटलची आहे. तुरीचे दर आता ४४०० ते ५३५२ रुपये क्‍विंटलवर स्थिरावले असले तरी त्यात चढउतार अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रक्रिया उद्योगांची मागणी दरावर परिणाम करणारी ठरते. त्यामुळे वाढलेले दर किती काळ राहतील हे तुर्तास सांगणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. हरभऱ्याची आवक गेल्या आठवड्यात सात हजार क्‍विंटल होती. 

या आठवड्यात आवक २८०० क्‍विंटलपर्यंत खाली आली. आवक खाली येण्यासोबतच हरभऱ्याच्‍या दरातही घसरण झाली आहे. ३८५० ते ४३३० रुपये क्‍विंटल हरभऱ्याचे दर होते. या आठवड्यात हे दर ३७५० ते ४२७६ क्‍विंटलपर्यंत खाली आले. गव्हाची आवक सरासरी १००० क्‍विंटलची आहे. १७०० ते १८३४ रुपये क्‍विंटलने गव्हाचे व्यवहार झाले. सरासरी हेच दर आठवडाभरापासून स्थिर असल्याचे चित्र आहे. मुगाची ६७ क्‍विंटलची एकदाच आवक होत ४८०० ते ५००० रुपये क्‍विंटलने व्यवहार झाले. 

बाजारात तांदूळ ४५०० ते ५००० रुपयांवर स्थिरावला. तांदळाची आवक अवघी ४० क्‍विंटलची होती. लुचई तांदूळ २२०० ते २४०० रुपयांवर महिनाभरपासून स्थिर आहे. या तांदूळाची आवक १०० क्‍विंटलची आहे. सोयाबीनची १२४ क्‍विंटलची आवक आणि दर गेल्या आठवड्यात ३४५० ते ३७६० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात सोयाबीनचे दर ३४०० ते ३६८४ रुपये क्‍विंटलवर पोचले. बाजारात लाल कांद्याची ५००० क्‍विंटलची आवक तर दर ७०० ते ९०० रुपये क्‍विंटल होते. पांढऱ्या कांदयाचे दर ८०० ते १००० रुपये आणि आवक २००० क्‍विंटलची होती. १००० ते ४००० रुपये क्‍विंटल असा लसणाचा दर आणि आवक १४०० क्‍विंटल. 

टोमॅटो १२०० ते १६०० रुपये क्‍विंटल आवक १२० क्‍विंटल. चवळी शेंगाची १८० क्‍विंटल आवक आणि दर १००० ते १२०० रुपये असा होता. कच्च्या पपईला ८०० ते १००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. पपईची आवक ९० क्‍विंटल होती. हिरव्या मिरचीची आवक २१० क्‍विंटल आणि दर ३४०० ते ३८०० रुपये क्‍विंटल होता. बाजारात काकडीची १५० क्‍विंटलची सरासरी आवक होती. काकडीचे दर १२०० ते १५०० रुपये क्‍विंटल राहिले. 

गाजराची २१० क्‍विंटलची आवक आणि दर ६०० ते १००० रुपये क्‍विंटल असे होते. फणस १५०० ते २००० रुपये क्‍विंटल आणि दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटल. कच्चे आंबे १४० क्‍विंटलची आवक आणि  दर २५०० ते ३००० रुपये. पालक १४५ क्‍विंटल आवक आणि दर ८०० ते १००० रुपये क्‍विंटल. ढेमूस १५३ क्‍विंटल आवक आणि दर  २४०० ते २८०० रुपये याप्रमाणे होते.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...