agriculture news in marathi, In the Kalingaad producer crisis in Yavatmal district | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मागील पाच वर्षांपासून कलिंगडाची लागवड करीत आहे. या माध्यमातून विक्रमी उत्पादनही घेतो. यंदा शास्त्रोक्त पद्धतीने सात एकरांवर कलिंगडाची लागवड केली. त्यासाठी पाच लाखांचा खर्च आला. परंतु, मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्यामुळे केवळ पन्नास हजारांचे उत्पादन होईल, अशी स्थिती आहे. या गंभीर संकटामुळे भविष्यात जिल्ह्यात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी शक्यता आहे. 
- मिथुन लोंढे, प्रगतिशील शेतकरी, पिंपरी (जि. यवतमाळ)

यवतमाळ  : अलीकडच्या काळात जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा तोट्यातील व्यवसाय नफ्यात आणला आहे. हजारो प्रयोगशील शेतकऱ्यांनी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात कलिंगडासारखे पीक घेणे सुरू केले. मात्र, या वर्षी कलिंगडाची फळे गळून पडत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. याला केवळ निकृष्ट दर्जाचे बियाणेच जबाबदार असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील चार-पाच वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात कलिंगड व खरबुजाची शेती करीत आहेत. या पिकांमुळे त्यांना चांगल्याप्रकारे नफा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळले. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या पिकाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे यंदा शेकडो शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये आपल्या भागात पिकाची लागवड केली जात असते. ९० दिवसांनी याला साधारणतः तीन ते पाच किलो वजनाचे फळ लागते. परंतु, यावर्षी ९० दिवसांचा कालखंड लोटूनसुद्धा वेलीला केवळ ५० ते १०० ग्रॅम वजनाचे कलिंगड लागली. त्यांचे वजन वाढत नसून, मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे.

दरवर्षीप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करूनही कलिंगड का गळत आहेत, या चिंतेत शेतकरी आहेत. ही फळगळ केवळ यवतमाळ जिल्ह्यातच होत असून, इतर जिल्ह्यात मात्र, कलिंगडाचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळगळ ही हवामानाच्या बदलामुळे होत नसून, सदोष बियाण्यांमुळे होत आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सर्वसाधारणपणे आपल्या भागात ज्या कंपन्या बियाणे पुरवठा करतात, त्याच कंपन्या शेजारील जिल्ह्यातही पुरवठा करतात. शेतकऱ्यांनी लगतच्या जिल्ह्यात चौकशी केली. त्या वेळी या कंपनीचे बियाणे त्या ठिकाणी चांगले निघाले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात पुरविल्या गेलेला लॉट हा सदोष  असल्यामुळे फळगळ होत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...