agriculture news in marathi Kalingad in the state is 200 to 1000 rupees | Agrowon

राज्यात कलिंगड २०० ते १००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडांची आवक कमी आहे.

जळगावात क्विंटलला ४०० ते ७०० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडांची आवक कमी आहे. कलिंगडाची खरेदी व्यापारी, खरेदीदार थेट शिवारात किंवा शिवार पद्धतीने करतात. कलिंगडाचा जळगाव जिल्ह्यात सध्या ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी ५०० रुपये दर मिळत आहे. 

सध्या काढणीचे सुरवातीचे दिवस आहेत. दर्जेदार कलिंगडास प्रतिक्विंटल ७०० रुपये दर मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या रोज १५ ट्रक (एक ट्रक सात टन क्षमता) कलिंगडांची आवक होत आहे. लागवड चोपडा, जळगाव, जामनेर, यावल, रावेर आदी भागात झाली आहे. याच भागात आवक अलीकडेच सुरू झाली आहे. 

जळगाव येथील बाजार समितीतही आठवड्यातून तीन दिवस कलिंगडाची अधिकची आवक होत आहे. बाजार समितीतही कमाल दर ७०० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. दर सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली.

नाशिकमध्ये क्विंटलला ४०० ते ९०० रुपये 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.३) कलिंगडांची आवक ८४० क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल किमान ४०० ते कमाल ९०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० रुपये होते. सध्या आवक सर्वसाधारण आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने सध्या मागणी वाढत आहे. मात्र अद्याप दर कमीच आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात आवक सर्वसाधारण होती. मात्र आवकेत हळूहळू वाढ होत आहे. मात्र गत सप्ताहात आवक कमी जास्त असल्याने मागणीनुसार दरात चढउतार आहे. मंगळवारी (ता.२)आवक १८३ क्विंटल झाली. त्यास ४०० ते ९०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० रुपये होता.

सोमवारी (ता.१) आवक झाली नाही. तर रविवारी (ता.२८) फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.२७) आवक १२० क्विंटल झाली. त्यास ४०० ते ८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६०० होता. शुक्रवारी (ता.२६) आवक १२० क्विंटल झाली. त्यास ४०० ते ८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६०० होता. गुरुवारी (ता.२५) आवक १५० क्विंटल झाली. त्यास ४०० ते ८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ६०० राहिला.

पुण्यात क्विंटलला ८०० ते १००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) कलिंगडाची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. उन्हाची काहिली वाढू लागल्यामुळे मागणी देखील वाढली आहे. या मुळे प्रति किलोला ८ ते १० रुपये दर मिळत आहे. कलिंगडांची काढणी हळूहळू सुरु झाली आहे. आवक देखील वाढू लागली  आहे. सरासरी दरापेक्षा दर वाढलेले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला सरासरी ५०० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ४) कलिंगडाची १३० क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २६ फेब्रुवारीला ६७ क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सरासरी ४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. २७ फेब्रुवारीला कलिंगडाची आवक १३० क्विंटल, तर सरासरी दर ४५० रुपये राहिले. २८ फेब्रुवारीला १०९ क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सरासरी ५०० रुपये दर मिळाला. 

एक मार्चला कलिंगडाची आवक ३३ क्विंटल, तर सरासरी दर ४५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २ मार्चला ५५ क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर ३ मार्चला ५५ क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे सरासरी दर ५०० रुपये राहिल्याची माहिती बाजार समितीने दिली.

नगरमध्ये क्विंटलला ४०० ते ५०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला १४ ते २० क्विंटल कलिंगडची आवक होत आहे. कलिंगडाला ४०० ते ५०० व सरासरी ४५० रुपयांचा दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्‍यात आली.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडांची पंधरा दिवसांपासून आवक सुरु आहे. २२ फेब्रुवारी रोजी १० क्विंटलची आवक होऊन ३०० ते ७०० रुपये व सरासरी ५०० रुपयांचा दर मिळाला. १८ फेब्रुवारी रोजी १४ क्विंटलची आवक होऊन ३०० ते ६०० व सरासरी ४५० रुपयाचा दर मिळाला. 

१५ फेब्रुवारीला २१ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ६०० व सरासरी ५५० रुपयाचा दर मिळाला. १३ फेब्रुवारी रोजी १५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ६०० व सरासरी ५५० रुपयांचा दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरात सातत्याने चढउतार होत आहे.

परभणीत क्विंटलला २०० ते ७०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.४) कलिंगडांची २१० क्विंटल आवक होती. त्यांना प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ७०० रुपये, तर सरासरी ४५० रुपये दर  मिळाले अशी, माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून दररोज १५० ते २५० क्विंटल कलिंगडांची आवक होत आहे. गुरुवारी (ता. ४) कलिगडांची २१० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २०० ते ७०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ७ ते १० रुपये किलो दराने सुरु होती, असे व्यापारी मो.इब्राहिम यांनी सांगितले.

सांगलीत क्विंटलला ३०० ते ६०० रुपये

सांगली : येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कलिंगडाच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. ४) कलिंगडाची क्विंटल २०० आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ६००, तर सरासरी ४५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात कलिंगडाची आवक वाळवा, विटा, मिरज, या तालुक्यात होते. बुधवारी (ता.३) १०८० क्विंटल  कलिंगडाची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल  ४०० ते ६००, तर सरासरी ५०० रुपये दर मिळाला. मंगळवारी (ता. २) कलिंगडाची ४०० क्विंटल आवक झाली. कलिंगडास  प्रतिक्विंटल ३०० ते ६००, तर सरासरी ४५० रुपये असा दर होता. 

सोमवारी (ता. १) कलिंगडाची ४०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ६००, तर सरासरी ४५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता. २७) कलिंगडाची ७४५ क्विंटल आवक झाली होती. त्यास ३०० ते ६००, तर सरासरी ४५० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात कलिंगडाच्या आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे.  दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...