कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवर

नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण अनुभवण्यात आली. सद्या सोयाबीनचे व्यवहार ४४०० ते ५७५० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनची आवक २८८० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.
In Kalmana Market Committee Soybeans at Rs 5,750
In Kalmana Market Committee Soybeans at Rs 5,750

नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण अनुभवण्यात आली. सद्या सोयाबीनचे व्यवहार ४४०० ते ५७५० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनची आवक २८८० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. 

सोयाबीनमधील आर्द्रता आणि दर्जा पाहून दर ठरतो, असे व्यापारी सांगतात.  सोयाबीन नजीकच्या काळात अधिक प्रमाणात विक्रीसाठी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कळमना बाजार समितीत गहू आवक १००० क्‍विंटल, तर दर १८०० ते २२३२, तांदूळ आवक ३० आणि दर ४२०० ते ४५००, हरभरा दर ४२०० ते ४८०० आणि आवक २१५ क्‍विंटलची होती. तुरीचे व्यवहार ५८०० ते ६४०० रुपयांनी झाले. बाजारात नव्या तुरीची आवक होण्यास अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे तुरीची आवक देखील जेमतेम २५७ क्‍विंटलच्या घरात असल्याची माहिती देण्यात आली. 

संत्री आवक जोमात 

कळमणा बाजार समितीत संत्र्यांची आवक सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या संत्र्यांना १५०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा दर होता. संत्र्यांची आवक ३००० क्‍विंटलच्या घरात होती. या आठवड्यात दरात तेजी अनुभवली गेली. ३००० क्‍विंटल आवक होत व्यवहार १८०० ते २२०० रुपयांनी झाले. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या संत्र्याला ४०० ते ५०० रुपये, मध्यम फळांना ९०० ते ११०० रुपये असा दर होता. या आठवड्यात लहान फळांचे दर ४०० ते ५०० आणि मध्यम आकाराच्या फळांचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. 

मोसंबीची आवक घटली 

मोसंबीची देखील आवक नियमित असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांचे व्यवहार १५०० ते २२०० रुपये क्‍विंटलने झाले. त्याचवेळी मध्यम आकाराच्या फळांना १००० ते १२०० आणि लहान फळांना ७०० ते ९०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात लहान फळांना ७०० ते ९००, मध्यम फळांना १२०० ते १५०० आणि मोठ्या फळांना १८०० ते २२०० रुपये असा दर होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com