खानदेशातील बाजार समित्यांत कांदा आवकेत वाढ

खानदेशातील बाजार समित्यांत कांदा आवकेत वाढ
खानदेशातील बाजार समित्यांत कांदा आवकेत वाढ

जळगाव : खानदेशातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकेत मागील सात-आठ दिवसांत वाढ झाली. जळगाव बाजार समितीत मागील दोन दिवसांत केवळ लाल कांद्याची १६०० क्विंटलवर आवक झाली. पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), धुळे, अडावद (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील बाजारातही आवक वाढत असल्याची माहिती मिळाली.

नवीन कांद्याची अधिक, तर जुन्या लाल कांद्याची कमी अधिक आवक आहे. जुन्या कांद्याला नवीन कांद्याच्या तुलनेत कमी दर आहेत. या महिन्याच्या सुरवातीला जळगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रतिदिन ६०० ते ७०० क्विंटलपर्यंतची आवक होती. परंतु दुसऱ्या पंधरवड्यात आवक वाढून ती उच्चांकी पातळीवर पोचली. जळगावात यावल, जामनेर, पाचोरा, एरंडोल, जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यांतील घाट परिसरातून कांद्याची आवक आहे. चाळीसगाव बाजार समितीत चाळीसगाव, कन्नड (जि. औरंगाबाद) येथून कांद्याची आवक होत आहे.

धुळे जिल्ह्यात पिंपळनेर व धुळे बाजार समितीत ती टिकून आहे. या जिल्ह्यातील सर्व बाजारांमध्ये मिळून प्रतिदिन १८०० क्विंटलपर्यंतची आवक आहे. लाल कांद्याचे दर दबावात आहेत. किमान ३५० व कमाल ९००, तर सरासरी ७०० रुपये दर जळगाव बाजार समितीत आहेत. धुळ्यातही किमान दर ४०० रुपयांखाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. लाल कांदा अधिक वेळ साठविता येत नसल्याने त्याची विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. पुढील महिन्यात ही आवक कमी होईल, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com