Agriculture news in marathi Kandebagh banana cultivation Preparations complete, planting begins | Agrowon

कांदेबाग केळी लागवडीची तयारी पूर्ण, लागवड सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी पूर्ण होत आली आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात होणार आहे.

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी पूर्ण होत आली आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात होणार आहे. लागवडीसाठी शेतकरी वाणांची शोधाशोध करीत आहेत.

काळ्या कसदार जमिनीत लागवडीसाठी हलक्या जमिनीतील केळी बागांमधील कंद आणले जात आहेत. कंद सध्या रावेर, नंदुरबारमधील शहादा, शिरपूर भागात उपलब्ध आहेत. लागवड शिरपूर तालुक्यातील अनेर नदीकाठी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. शिरपूर तालुक्यात तरडी, भावेर, होळनांथे, जापोरा, घोडीसगाव, तोंदे आदी भाग कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध आहे. 

चोपडा तालुक्यातील घोडगाव, कुसुंबा, विटनेर, वाळकी, वढोदा, मोहिदे, अजंतीसिम, माचला, वरगव्हाण, नारोद, गोरगावले, खेडीभोकरी, खडगाव आदी भाग कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध आहे. चोपडा तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टरवर कांदेबाग केळी लागवड होईल. तर, शिरपूर तालुक्यातही सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर कांदेबाग केळी असणार आहे.

जळगाव तालुक्यात सुमारे एक हजार ते १२०० हेक्टरवर कांदेबाग केळी असेल. केळी लागवड मूग, उडदाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात केली जाईल. काही शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते. 

कांदेबाग केळी लागवडीची तयारी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकऱ्यांनी लागवड पूर्ण केली आहे. लागवडीला पुढील आठवड्यात वेग येऊ शकतो.
- श्रीकांत पाटील, शेतकरी, कठोरा (जि.जळगाव)


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...