agriculture news in marathi, Kanubai festival celebrates in Khandesh | Agrowon

खान्‍देशात कानुबाईचा उत्सव आनंदात साजरा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
जळगाव : श्रावणात नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी (ता.१८) खानदेशात कानुबाईचा उत्सव सुरू झाला. रविवारी (ता.१९) घरोघरी विधिवत पूजा झाली. कानुबाईची गीते म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला. घरोघरी स्थापना झालेल्या कानुबाईचे विसर्जन सोमवारी (ता.२०) सकाळी सुरू झाले. अनेक ठिकाणी वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. महिला, मुली, बालगोपाळांनी या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.
 
जळगाव : श्रावणात नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी (ता.१८) खानदेशात कानुबाईचा उत्सव सुरू झाला. रविवारी (ता.१९) घरोघरी विधिवत पूजा झाली. कानुबाईची गीते म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला. घरोघरी स्थापना झालेल्या कानुबाईचे विसर्जन सोमवारी (ता.२०) सकाळी सुरू झाले. अनेक ठिकाणी वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. महिला, मुली, बालगोपाळांनी या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.
 
या उत्सवानिमित्त बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिनित्त स्थिरावलेली मंडळी आपापल्या गावी आली होती. गावांमध्ये चैतन्य, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कानुबाईमाता उत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे. त्यासाठी मुहूर्त पाहत नाहीत. नागपंचमीनंतरच्या येणाऱ्या शनिवारी व रविवारी रोट होतात.
 
चाळीसगावजवळ उमरखेड येथे कानुबाईचे मंदिर आहे. ज्यांना प्रथमच कानुबाईची स्थापना करायची होती, त्यांनी एक नारळ उमरखेड येथील मंदिरातील कानुबाईच्या मूर्तीला स्पर्श करून आणले. या नारळाची सजावट करून त्याची स्थापना केली. नथ, इतर पारंपरिक दागिने त्यास चढविण्यात आले. 
केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून कानुबाईची स्थापना झाली. आरती, नैवेद्य दाखविण्यात आले. नैवेद्यात पुरणपोळ्या, पुरणाचे दिवे तयार केले होते. आमटी, भाजी, कांस्य धातूने तयार केलेल्या ताटात ठेवून देवीला ओवाळण्यात आला.
 
रविवारी दुपारी फुगड्या, गाणी म्हटली जात होती. रात्री जागरण करण्यात आले. काही भक्तांनी तयार केलेले रोट (विनातेलाच्या जाड पोळ्या) परातीत घेऊन कानुबाईचे दर्शन घेतले. सोमवारी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण करण्यात आली.

इतर बातम्या
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...