agriculture news in marathi karamba village which provides fertilizers, seeds to farmers and employment to women | Agrowon

शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना रोजगार पुरविणारी कारंबा ग्रामपंचायत

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते, दिवाबत्ती यांसारख्या सार्वजनिक मूलभूत सोयीसुविधांसह विविध घटकांना शासकीय योजनांचा वैयक्तिक लाभ देण्यात कारंबा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) ग्रामपंचायतीने आघाडी घेतली. गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी घरच्या घरी रोजगार आणि हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे देणारी ग्रामपंचायत म्हणून कारंब्याने लौकिक मिळवला आहे.

शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते, दिवाबत्ती यांसारख्या सार्वजनिक मूलभूत सोयीसुविधांसह विविध घटकांना शासकीय योजनांचा वैयक्तिक लाभ देण्यात कारंबा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) ग्रामपंचायतीने आघाडी घेतली. गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी घरच्या घरी रोजगार आणि हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे देणारी ग्रामपंचायत म्हणून कारंब्याने लौकिक मिळवला आहे.

सोलापूर-बार्शी रस्त्यावरील कारंबा हे ३२०० लोकवस्तीचे गाव. सोलापूरपासून अवघ्या बारा किलोमीटरवर असल्याने गाव आणि शहरात फारसे अंतर नाही. पण विकासकामामध्ये गेल्या दोन वर्षात एक वेगळी ओळख ग्रामपंचायतीने तयार केली. दोन वर्षापूर्वी थेट सरपंच निवडीतून लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ. कौशल्या विनायक सुतार आणि त्यांच्या टीमने पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकासाला चालना दिली.

रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांसारख्या सार्वजनिक सोयीसुविधा ग्रामपंचायतीने पुरवल्याच, त्यापुढे जाऊन सर्वाधिक वैयक्तिक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचतील यासाठी सरपंच सौ. सुतार यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच आज गावातील उपेक्षित, गरजूंना घरकुले, प्रत्येक कुटुंबाला गॅसजोडणी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह स्कूल बॅग, मुलींना सायकल, महिलांना शिलाई यंत्र, बचत गटातील प्रत्येक महिलेला रोजगारासाठी विनापरतावा थेट अनुदान आणि कामगार कल्याण योजनेतून शेतमजुरांनाही आर्थिक साह्य यांसारख्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभाही होत साडेसहा किलोमीटर गाव ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण लोकसहभागातून करण्यात आले.

जलशुद्धीकरण प्रकल्प

 • गावाच्या पाणी योजनेसाठी दोन किलोमीटरवरून पाइपलाइन केलेली पूर्वीची योजना आहे. पण ती हंगामापुरती चालते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्रमुख चौकात कूपनलिका घेऊन पाण्याच्या टाक्यांची सोय केली आहे. सात हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्या बसवल्या आहेत.
   
 • ग्रामस्थांना कायम शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ) उभारला आहे. या माध्यमातून पाच रुपयांत १५ लिटर शुद्ध पाणी दिले जाते.

गॅस जोडणीची योजना

 • नान्नज येथील माळढोक अभयारण्य परिक्षेत्रात कारंबा हे गाव येत असल्याने अभयारण्यामध्ये गावकऱ्यांनी जळणासाठी वृक्षतोड करू नये, यासाठी डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गॅसजोडणीची योजना आणली. ग्रामपंचायतीने ही योजना घरोघरी राबवली. यातूनच ५०७ कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली. त्यामध्ये दोन सिलिंडर आणि पुढील तीन वर्षात १८ सिलिंडर मोफत मिळणार आहेत. आणखी काही कुटुंबांना लवकरच गॅसजोडणी मिळणार आहे. त्यामुळे वृक्षतोड थांबली, तसेच केरोसीनमुक्त गाव होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मदत

 • गावात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, जिल्हा परिषद उर्दू आणि मातोश्री वत्सलाबाई मुनाळे माध्यमिक प्रशाला आहे. जवळपास २५० हून अधिक विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात. या विद्यार्थ्यांना दरवर्षी जूनमध्ये स्कूलबॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
   
 • माध्यमिक प्रशाला गावापासून दीड किलोमीटर लांब आहे. या शाळेत शिकणाऱ्या ४१ मुलींना शासनाच्या योजनेसह लोकवर्गणीतून सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

महिलांना घरच्या घरी रोजगार

 • सोलापूर सोशल फाउंडेशन आणि कमल लघू उद्योग (सोलापूर) यांच्या माध्यमातून गारमेंट उद्योग प्रकल्पातून महिलांना घरच्या घरी रोजगार देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. यासाठी ग्रामपंचायतीला माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी मोठी मदत केली.
   
 • या प्रकल्पात शालेय गणवेश, टाय, बेल्ट आदींच्या शिलाईची कामे महिलांना घरच्या घरी देऊन रोजगार देण्यात आला. पहिल्या टप्प्यात १०० महिलांना रोजगार मिळाला आहे. बचत गटातील महिलांनाही ग्रामपंचायतीने प्रतिगट ३० हजारांचे थेट अनुदान दिले आहे. ३० गटातील १८० महिलांना साडेपाच लाखांचे विनापरतावा साह्य देण्यात आले.

शेतकऱ्यांना खते, बियाण्यांचे वाटप

 • ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सरकारी योजना गावात राबविल्या जातात. कारंबा ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविली आहे.
   
 • कारंबा परिसरात कांद्याची सर्वाधिक लागवड होते. हे लक्षात घेऊन दरवर्षी कांदा बियाणे आणि खते देण्यात येतात. गतवर्षी गटातील शेतकऱ्यांना एक किलो कांदा बियाणे आणि अन्नद्रव्यांचे एक पोते मोफत दिले. शासनाच्या योजनेतून दरवर्षी प्रत्येकी १० शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप करण्यात येते.

सरपंच सुकन्या योजना

 • गावातील ज्या पालकाला फक्त मुलीच आहेत, अशा मुलींच्या नावे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुकन्या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांची दामदुप्पट ठेव योजना सुरु केली आहे. आतापर्यंत गावातील २० मुलींच्या नावे ही ठेव ठेवण्यात आली.

सरपंचाचे रिपोर्ट कार्ड

 • लोकनियुक्त सरपंच सौ. कौशल्या सुतार यांनी दोन्ही वर्षांचे रिपोर्ट कार्ड ग्रामस्थांना दिले आहे. त्यामध्ये प्रत्येक वर्षाच्या कामाचा अहवाल एका पुस्तिकेद्वारे प्रसिद्ध केला जातो. यामध्ये गावातील कोणत्या नागरिकाला काय लाभ दिला, याची माहिती दिली आहे. तसेच रस्ते, दिवाबत्ती यासह ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविलेल्या योजनांची माहिती देण्यात येते.
   
 • या सगळ्या उपक्रमात उपसरपंच सौ. वैशाली कांबळे, सदस्य श्रीकांत आदाटे, युन्नूस शेख, सौ. स्मिता पाटील, सौ. अश्‍विनी बहिर्जे, अशोक बहिर्जे, सौ. लक्ष्मी बहिर्जे, सौ. कविता भोरे, दिलीप मस्के, तुकाराम चव्हाण, सौ. निलावती पवार आणि ग्रामसेवक नीलिमा उघडे यांचे चांगले सहकार्य मिळते.

नावीन्यपूर्ण उपक्रम

 • महिलांसाठी खास ग्रामसभेचे आयोजन.
   
 • नियमित घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्यांचा जाहीर सत्कार.
   
 • वर्षभर महिलांसाठी खास प्रोत्साहनपर स्पर्धा.
   
 • शालेय विद्यार्थी, तरुण, महिलांसाठी शुभेच्छासंदेश पत्रे.
   
 • कृषी प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांच्या सहली.
   
 • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
   
 • गावातील होतकरू विद्यार्थ्यांना लोकमंगल समूहाच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
   
 • मुलांसाठी दिवाळीत किल्ले बांधणी स्पर्धा.
   
 • सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे १८० किट वाटप.

ठळक कामे

 • साथीच्या रोगावर प्रतिबंधासाठी गावात नियमितपणे फवारणी.
   
 • गरजू रुग्णांना रक्त, आरोग्यविषयक मदत.
   
 • तरुणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा.
   
 • २७ महिलांना रोजगारासाठी शिलाई यंत्रांचे वाटप.
   
 • आरोग्यसुविधेसाठी ७२० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड.
   
 • ४ दिव्यांगांना सायकलींचे वाटप.
   
 • १५० बांधकाम मजुरांना प्रत्येकी ५ हजारांची मदत.
   
 • १८ नागरिकांना घरकुलासाठी प्रत्येकी सव्वा लाखांचे अनुदान.
   
 • जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांना खेळणी साहित्य.
   
 • कचरा साठवण्यासाठी ७०० महिलांना कचराकुंड्या वाटप.

रस्ते, विजेची सोय

 • १४ व्या वित्त आयोगातून गावातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची कामे.
   
 • मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आणि राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एनटीपीसी) सीएसआर फंडातून सुमारे १५ रस्तांची कामे.
   
 • प्रमुख चौक आणि गल्लीमध्ये ८ ठिकाणी हायमास्ट दिवे, १७ एलईडी दिव्यांची सोय.
   
 • गावातील वेस, मारुती मंदिर, बिरोबा मंदिर, शाळा परिसरात पेव्हर ब्लाॅक.
   
 • स्मशानभूमीमध्ये सुधारणा.

सरपंच प्रतिक्रियाः

ॲग्रोवन सरपंच महापरिषदेतून प्रेरणा
‘‘ग्रामविकासाबरोबर आम्हाला लोकांच्या जगण्यामध्ये बदल करायचा आहे, त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवितो. यासाठी ॲग्रोवन सरपंच महापरिषेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रयोगशील सरपंचांचे अनुभव फायदेशीर ठरले. शेतकरी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सौ. कौशल्या विनायक सुतार, ९९२३४०६९८२


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...
तयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
शहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...
ग्रामस्वच्छता, जलसंधारणातून मधापुरीची...सामूहिक प्रयत्नातून गावाचा कसा कायापालट करता येऊ...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
स्मार्ट गावाच्या दिशेने...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...
जल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेनेउत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील...
नावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी...नगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) गावाची वाटचाल...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...