नगरमध्ये कारले २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

नगरमध्ये कारले २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
नगरमध्ये कारले २००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

नगर  : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (शनिवारी) कार्ल्यांची ४१ क्विटंलची आवक झाली. कार्ल्यांला २००० ते ५००० रुपये व सरासरी ३५०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याची आवक दररोज कमी जास्त होत आहे. शनिवारी (ता. २५) टोमॅटोची १०१ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २२०० व सरासरी १३१० रुपयाचा दर मिळाला. वांग्याची ८६ क्विंटलची आवक झाली. त्यास ५०० ते २००० व सरासरी १२५० रुयाचा दर मिळाला. प्लाॉवरची ९२ क्विंटलची आवक झाली. त्यास ५०० ते ४५०० व सरासरी आडीच हजार रुपयांचा दर मिळाला. कोबीची ६१ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५०० व सरासरी तेराशे रुपयाचा दर मिळाला. काकडीची ६१ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास ४००० ते १००० व सरासरी ७०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. 

दोडक्याची ४६ क्विंटलची आवक, तर दर १००० ते ३०००, सरासरी २००० रुपये, कैरीची ४८ क्विंटलची आवक, तर दर ५०० ते १५०० व सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. भेंडीची ७२ क्विंटलची आवक झाली. त्यास १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. बटाट्याची १२७४ क्विंटलची आवक झाली. त्यास ७०० ते १८०० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. लसणाची २१ क्विंटलची आवक होऊन ३००० ते १०००० रुपये व सरासरी ६५०० रुपयांचा दर मिळाला.  

हिरव्या मिरचीची ६७ क्विंटलची आवक झाली. त्यास ४००० ते ७००० व सरासरी ५१०० रुपयांचा दर मिळाला. शेवग्याची २६ क्विंटलची आवक होऊन २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयांचा दर मिळाला. लिंबाची १८ क्विंटलची आवक झाली. त्यास ३००० ते ६००० व सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला. सिमला मिरचीची २९ क्विंटलची आवक झाली. त्यास २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयाचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची ३१ क्विंटलची आवक झाली. त्यास ४०० ते १२०० व सरासरी ८०० रुपयाचा दर मिळाला. 

मेथीच्या ५४०० जुड्याची आवक झाली. तिच्या शंभर जुड्याला ७०० ते १३०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. पालकच्या ९५० जुड्याची आवक होऊन ५०० ते ८०० व सरासरी ६५०, कोथिंबिरीच्या ६५०० जुड्याची आवक होऊन ५०० ते १२०० व सरासरी ८५० रुपये दर मिळाला. शेपूची ६५० जुड्याची आवक झाली. त्यास ६०० ते ८०० व सरासरी ७०० रुपयाचा दर मिळाला, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com