agriculture news in marathi, Karnataka Milk blocked | Agrowon

कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात सगळीकडेच शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. १८) जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच लाख लिटर संकलन बंदच होते. अनेक ठिकाणी दूध ओतणे, टॅंकर फोडणे, अडवणे अशा पद्धतीची आंदोलने सुरूच राहिली. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली; पण नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. पण संघटनांनी हे आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचे जाहीर करत गुरुवारी (ता.

सोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात सगळीकडेच शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. १८) जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच लाख लिटर संकलन बंदच होते. अनेक ठिकाणी दूध ओतणे, टॅंकर फोडणे, अडवणे अशा पद्धतीची आंदोलने सुरूच राहिली. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली; पण नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. पण संघटनांनी हे आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचे जाहीर करत गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात ठिकठिकाणी जनावरांसह रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकच्या सीमा भागातून येणारे दूध मंगळवारी सायंकाळी वडकबाळ गावानजीक कार्यकर्त्यांनी अडवले. त्यानंतर हे दूध गावातील गरीब लोकांना वाटण्यात आले. त्याशिवाय बेगमपूर (ता. मोहोळ) येथे नेचर दूध डेअरीच्या प्लान्टमध्ये शेतकऱ्यांनी थेट घुसून डेअरीमधील टाक्‍यांमध्ये असलेले जवळपास २० हजार लिटर दूध सांडून टाकले.

पंढरपुरातही दूधपुरवठा करण्यासाठी आणण्यात येत असलेला एक टॅंकर कार्यकर्त्यांनी शहरात पकडून फोडला. त्यातील दूध पंढरपुरातील वारकऱ्यांना वाटण्यात आले. त्याशिवाय तालुक्‍यातील तुंगत येथे मध्यरात्री शिवामृत दूध संघाचे सोलापूरकडे निघालेले पाच टॅंकर अडवले. यामध्ये तीन टॅंकरमध्ये दूध आणि दोन गाड्यांमध्ये दूध पिशव्या आंदोलकांनी माघारी पाठविले. जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा संघटक विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष तानाजी बागल, आदींनी आंदोलनात भाग घेतला.

माळशिरस आणि माढा तालुक्‍यातही काही भागांत कार्यकर्त्यांनी दूध टॅंकर फोडले. दरम्यान, आंदोलनाची ही धार वाढतच असल्याने सोलापूर जिल्हा दूध संघासह खासगी दूध व्यवसायिकांनी तिसऱ्या दिवशीही संकलन बंद ठेवले.

 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...