agriculture news in marathi, karnataki bedur today, kolhpaur, maharashtra | Agrowon

कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या भागात आज (मंगळवारी) कर्नाटकी बेंदूर साजरा होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरचा काही भाग, इचलकरंजी, गडहिंग्लजच्या बहुतांशी भागात हा बेंदूर साजरा केला जातो. कर तोडण्यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या भागात आज (मंगळवारी) कर्नाटकी बेंदूर साजरा होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरचा काही भाग, इचलकरंजी, गडहिंग्लजच्या बहुतांशी भागात हा बेंदूर साजरा केला जातो. कर तोडण्यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

या शहरांच्या बाजारपेठेत रंगीबेरंगी दोरी, घुंगराच्या माळा, कंडा, हनपटी, शेंब्या, वेसण, म्हुरकी, झालर, झुला, रंग डबा, लगाम, गोंडे, नाथे, कवळी या वस्तू दाखल झाल्या. बाजारपेठेत निरनिराळे गोंडे, मातीचे बैल, घुंगराच्या माळा शेतकऱ्यांना आकर्षित करीत होते. यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने बाजारात काहीशी मंदी आहे. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. माल वाहतुकीसाठी शहरात बैलांचा वापर कमी केला जात आहे. त्यामुळे यंदा खरेदीसाठी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पेट्रोल दरवाढीमुळे सजावट साहित्याचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. सुती दोराही महाग झाला आहे.

शेतकऱ्यांचा बैल सजावटीचा खर्च हा किमान ५०० ते १००० रुपयांपर्यंत होत असतो; पण या वर्षी वाढलेल्या दरामुळे कमीत कमी खर्चात या सर्व साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. दर कितीही असले तरी बैलपोळ्याच्या दिवशी सजलेल्या ‘सर्जा राजा’ला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनविलेल्या दिटमणीला शेतकरी वर्गातून अधिक मागणी आहे.

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...