Agriculture news in marathi Karpa's disease on turmeric in Hingoli, Nanded and Parbhani districts | Agrowon

हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

अनेक वर्षांपासून एकाच वाणाची लागवड केली जात आहे. योग्य पद्धतीने बेणे प्रक्रिया न केल्यामुळे, जास्त पाऊस झाल्यामुळे ओलावा वाढला. परिणामी हळदीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. करप्यामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येऊ शकते.
- अनिल ओळंबे, विशेषज्ञ,
उद्यानविद्या केव्हीके, तोंडापूर, जि. हिंगोली

गतवर्षी दुष्काळामुळे पाणी उपलब्ध नव्हते. यंदा पावसाळा लांबल्यामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात घट येऊन आर्थिक नुकसान होणार आहे.
- बाळासाहेब राऊत, शेतकरी, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील हळद पिकांवर बुरशीजन्य करपा, तसेच कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला. यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी असूनही कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन मिळते. त्यामुळे हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील शेतकरी गेल्या काही वर्षांत हळद या मसालेवर्गीय पिकांकडे वळले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. हिंगोलीची हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या जिल्ह्यात सुमारे ३२ हजार हेक्टर, नांदेड जिल्ह्यात १५ हजार हेक्टर, परभणी जिल्ह्यात ५ हजार हेक्टर अशी एकूण ५२ हजारांवर हेक्टवर हळदीची लागवड झाली आहे. 

२०१८ मधील दुष्काळी परिस्थिती, २०१९ मध्ये अनेक भागात उशिरा आलेला पाऊस, यामुळे या जिल्ह्यांमध्ये हळद लागवडीस उशीर झाला. या भागात सुरुवातीच्या काळात कंदमाशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कंदकुज झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर सुरू असलेला पाऊस, यामुळे जमिनीत निर्माण झालेला अतिरिक्त ओलावा, आर्द्रता, यामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.

‘सेलम’चे वाण सर्वाधिक

या जिल्ह्यांमध्ये हळदीच्या सेलम या वाणांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या वाणाचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी या एकाच वाणाचे बेणे वापरतात. अनेक शेतकरी बुरशीनाशकांची योग्य पद्धतीने बेणे प्रक्रिया करत नाहीत. या तीन जिल्ह्यांतील हळदीच्या साधारणतः ५० टक्के क्षेत्रावर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. कंद भरण्याच्या अवस्थेत, त्यापूर्वीच करप्याचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कंदाचा आकार लहान राहिला. हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त घट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...