agriculture news in marathi, kartik vari starts in alandi, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदाच्या अखंड मंत्रोच्चारात बुधवारी सकाळी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदाच्या अखंड मंत्रोच्चारात बुधवारी सकाळी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

सकाळी नऊच्या सुमारास माउलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. मंदिराच्या सेवकांनी पायरी स्वच्छ केली. महाद्वारात पायरीपूजनासाठी भाविकांची गर्दी झाली. महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला वारकऱ्यांचा माउली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. गुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर माउलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.

देऊळवाड्यातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली. विजय कुलकर्णी, यज्ञेश्वर जोशी आणि तुर्की यांनी पौराहित्य केले. या वेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, बाबूराव चोपदार, डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, दिंडी संघटनेचे सचिव मारुती कोकाटे, आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, ज्ञानेश्वर वीर, डी. डी. भोसले, ज्ञानेश्वर गुळूंजकर, भाऊमहाराज फुरसुंगीकर, अजित वडगावकर उपस्थित होते.

हैबतबाबांच्या वतीने विश्वस्त आणि मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दुपारी माउलींच्या समाधीजवळ महानैवद्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी साडेसहा ते आठ वीणा मंडपात योगिराज ठाकूर आणि रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन, रात्री हैबतबाबा यांच्या पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्या वतीने जागरचा कार्यक्रम झाला. देवस्थानच्या वतीने वारी काळात दर्शनाच्या रांगेतील भाविकांना कार्तिकी वद्य अष्टमीपासून अमावास्येपर्यंतच्या कालावधीत मोफत खिचडी आणि चहा वाटप केला जात आहे. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियानऔरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती...
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले...अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक...
चक्रिवादळाचा थंडीवर परिणामकोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे...
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला...गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह...
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला...मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे...
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला...नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न...
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखलचंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी...
महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : ...मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील...
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच...भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी,...
निर्यातवृद्धीसाठी पायाभूत सुविधा...रत्नागिरी  : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
भाताला प्रति क्विंटलला ७०० रुपये बोनस सिंधुदुर्ग : शासनाने भाताला प्रतिक्विंटलला...
लाळ्या खुरकूतच्या लसींची गरजसांगली :  जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६...
साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली...
पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने...औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक...
केकत जळगावात बिबट्याची दहशतऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील केकत जळगावात...
किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच...
खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरूजळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६०...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या...नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी धडपड नाशिक : बियाण्यांची टंचाई, तसेच अतिवृष्टीमुळे...