पंढरपुरात कार्तिकी वारीचा उद्या मुख्य सोहळा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी दर्शनासाठी मार्गस्थ झालेल्या राज्यभरातील पायी दिंड्या पंढरपूरनजीक आल्या असून, कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा शुक्रवारी (ता. ८) होत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास शासकीय महापूजा होणार आहे. पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढत असून, श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शदर्शनाची रांग बुधवारी (ता. ६) घाटाच्याही पुढे गेली होती.

यंदा लांबलेल्या पावसामुळे कार्तिकी वारीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण, सध्या तरी वारकऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. आषाढी व कार्तिकी या दोन मोठ्या यात्रांदरम्यान पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्यात कार्तिकीचे गणित हे सगळे पावसावर अवलंबून असते. मॉन्सूनोत्तर पावसामुळे चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढू लागली आहे. सध्या नदी दुथडी भरून वाहत असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. यात्रेला आलेल्या भाविकांना मोकळेपणाने वावरता यावे, यासाठी घाटावरील सर्व स्टॉलचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

नदीचा प्रवाह वाढल्याने यात्रेदरम्यान सर्व होडीचालकांना आपल्या होड्या बंद ठेवण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आजपर्यंत (ता. ७) बहुतेक सर्व दिंड्यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. तसेच, वारकऱ्यांची संख्याही वाढणार आहे. यादृष्टीने पोलिस आणि प्रशासनाने नियोजन केले आहे. बुधवारी श्री विठ्ठलदर्शनाची रांग घाटाच्याही पुढे गेली होती. आज ही रांग आणखी लांबपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com