agriculture news in Marathi kartiki wari on tomorrow in Pandhrpur Maharashtra | Agrowon

पंढरपुरात कार्तिकी वारीचा उद्या मुख्य सोहळा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

कार्तिकी वारी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या (ता.२६) पंढरपुरात पार पडत आहे. पण कोरोनामुळे पंढरपूरसह परिसरातील दहा गावांत मंगळवारपासून (ता. २४) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

सोलापूर: कार्तिकी वारी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या (ता.२६) पंढरपुरात पार पडत आहे. पण कोरोनामुळे पंढरपूरसह परिसरातील दहा गावांत मंगळवारपासून (ता. २४) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारे पंढरपुरात येण्यापासून रोखण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त पंढरपूरच्या चारही बाजूंनी लावण्यात आला आहे. दुसरीकडे वारकऱ्यांच्या विरोधानंतरही परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. 

कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात वाढणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव- शिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. 

मंगळवारी मध्यरात्रीपासून संचारंबदी लागू केली आहे. गुरुवारी (ता. २६) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. परंतु वारकऱ्यांना पंढरपुरात बंदी असेल आणि त्यांचा हक्क हिरावून घेतला जात असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही महापूजा करण्याचा अधिकार नाही, नियम, कायदे सर्वांनाच सारखे आहेत, असे म्हणत वारकरी पाईक संघटनेने या महापूजेला विरोध केला आहे. पण उपमुख्यमंत्री पवार यांनी मात्र मी पंढरपुरात महापूजेला येणार असल्याचे म्हटले आहे.
 
गुरुवारी पहाटे श्री. पवार यांच्या हस्ते सपत्निक ही महापूजा होईल. पण दोन्ही बाजूंकडील शाब्दिक चकमकींमुळे काहीसा तणाव आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर वारकऱयांच्या प्रतिनिधींशी यावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...