मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
वसमत तालुक्यात ४० हेक्टरवर करवंद लागवड
हिंगोली : वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील हयातनगर, वसमत मंडळांतील गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुमारे ४० हेक्टरवर करवंदाची लागवड केली आहे. येत्या काळात शेतकरी गटाच्या माध्यमातून करवंदावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे यांनी दिली.

वसमत तालुक्यातील वसमत तसेच हयातनगर मंडळांतील वसमत, पांगरा सती, लिंगी, हयातनगर आदी गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ४० हेक्टरवर (१०० एकर) करवंदाची लागवड केली आहे. कळमनुरी तालुक्यातील करवंद उत्पादक शेतकऱ्यांकडून रोपे आणून ही लागवड केली आहे. करवंदाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर हे शेतकरी प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहेत. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी या विशेष पीक संरक्षक मोहिमेअंतर्गत लिंगी येथील लागवड केलेल्या करवंद पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी बळिराम कच्छवे, कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, मंडळ कृषी अधिकारी के. डी. शिंदे, प्रगतिशील शेतकरी बालाजी यशवंते आदींसह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.
- 1 of 1022
- ››