कसबे डिग्रजला भारत मदने ‘ऑरबिट केसरी’चा मानकरी

कसबे डिग्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भारत मदने याने समाधान पाटीलला आस्मान दाखवत ‘ऑरबिट केसरी’ किताब व चांदीची गदा पटकावली.
Kasbe Digrajla Bharat Madane Standard of Orbit Saffron
Kasbe Digrajla Bharat Madane Standard of Orbit Saffron

सांगली : कसबे डिग्रज, (ता. मिरज) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भारत मदने याने गदे लोट डावावर समाधान पाटीलला आस्मान दाखवत ‘ऑरबिट केसरी’ किताब व चांदीची गदा पटकावली.  दुसऱ्या क्रमांकासाठी पैलवान दादा मुलाणी आणि सुदेश ठाकूर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होत असताना गुणांच्या जोरावर सुदेश ठाकूरने बाजी मारत चांदीची गदा मिळवली. शिवजयंतीनिमित्त रणवीर ग्रुपतर्फे कुस्त्यांचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती ऑरबिट ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक दीपक राजमाने यांच्या हस्ते लावली. या कुस्तीसाठी ऑरबिट केसरी किताब, चांदीची गदा व दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान नीलेश सायमोते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चांदीची गदा दिली.  या वेळी निवेदक शंकर पुजारी यांना रणवीर ग्रुप व नीलेश सायमोते युवा मंच यांच्याकडून आनंदराव नलावडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी ज्योतिराम वाजे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रवीण (बाळू) अपराध, बंडू सायमोते, लेखन वालेकर, सचिन अपराध, नितीन अपराध, उमेश जामदार यांनी मैदान यशस्वी केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com