Agriculture news in marathi, From the Katepurna project Released water for rabbi | Page 3 ||| Agrowon

काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी सोडले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या रब्बी हंगामात पाणीवापर संस्थेच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेच्या रब्बी पिकांच्या हंगामासाठी पाणी व्यवस्थापनाची सुरवात खांबोरा येथील सांडव्यातून करण्यात आली.

अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या रब्बी हंगामात पाणीवापर संस्थेच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेच्या रब्बी पिकांच्या हंगामासाठी पाणी व्यवस्थापनाची सुरवात खांबोरा येथील सांडव्यातून करण्यात आली.

बोरगाव येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा संपूर्ण प्रकल्पावरील पाणीवापर संस्थेला ‘टेल- टु- हेड’ पाणी मिळावे. प्रत्येक पाणीवापर संस्थेचे सुलभरीत्या सिंचन व्हावे, या करिता काटेपूर्णा प्रकल्पावरील सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी प्रकल्पावरील देखभाल दुरुस्तीचे कामे करून ‘टेल’च्या शेतकऱ्पर्यंत पाणी पोचावे, या उद्देशाने चर्चा झाली होती. परंतु अजूनही देखभाल दुरुस्तीची कामे पाहिजे तशी झाली नाहीत, या बाबतीत शेतकऱ्यांनी पाणी सोडताना खंतही व्यक्त केली.

रब्बी हंगामाला उशीर होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी केलेला हरभरा व गव्हासाठी तयार केलेले शेतीचे क्षेत्र भिजवण्यासाठी पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे, असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांनी खांबोरा केटीवेअर येथून पाणी सोडताना सांगितले.

काटेपूर्णा प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, कार्याध्यक्ष दिगंबर पाटील गावंडे, पळसो शाखा अभियंता नीलेश घारे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश शर्मा, भुजिंग गावंडे, बाबाराव पाटील, पाणी व्यवस्थापनातील  कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
 


इतर बातम्या
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...