दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
रत्नागिरीत शिवसेनेला कौल
रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजयी मोहोर उमटवली.
रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजयी मोहोर उमटवली. चिपळूण, संगमेश्वरसह खेड, दापोली तालुक्यात काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला यश मिळाले; मात्र सुरवातीपासूनच दंड थोपटणाऱ्या भाजपला फारसे यश मिळवता आलेले नाही.
ग्रामपंचायत मतमोजणी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात झाल्या. रत्नागिरीतील मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झाली. रत्नागिरी तालुक्यातील ४१ पैकी ३४ ग्रापंचायतींवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी झाले.
उर्वरित चार ग्रामपंचायतींवर स्थानिक विकास पॅनेलने यश मिळवले. भाजपचे वर्चस्व असलेल्या कोतवडे, काळबादेवी या ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनलने बळकावल्या आहेत. राजापूरमधील ३४, लांजा १२ साखरपा येथील ९, अशा एकूण ५५ ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या ताब्यात आल्या आहेत.
राजापूरमध्ये राष्ट्रवादीला ३, भाजप ४, काँग्रेस २ आणि मनसेला २ ठिकाणी यश मिळाले. लांजात राष्ट्रवादीला १, काँग्रेसला १, स्थानिक पॅनेलला ३ तर साखरपा येथे एका ठिकाणी स्थानिक पॅनेल निवडून आले आहे.
- 1 of 1054
- ››