Agriculture news in marathi Kaul to Shiv Sena in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत शिवसेनेला कौल 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजयी मोहोर उमटवली.

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजयी मोहोर उमटवली. चिपळूण, संगमेश्‍वरसह खेड, दापोली तालुक्यात काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला यश मिळाले; मात्र सुरवातीपासूनच दंड थोपटणाऱ्या भाजपला फारसे यश मिळवता आलेले नाही. 

ग्रामपंचायत मतमोजणी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात झाल्या. रत्नागिरीतील मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झाली. रत्नागिरी तालुक्यातील ४१ पैकी ३४ ग्रापंचायतींवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी झाले.

उर्वरित चार ग्रामपंचायतींवर स्थानिक विकास पॅनेलने यश मिळवले. भाजपचे वर्चस्व असलेल्या कोतवडे, काळबादेवी या ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनलने बळकावल्या आहेत. राजापूरमधील ३४, लांजा १२ साखरपा येथील ९, अशा एकूण ५५ ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या ताब्यात आल्या आहेत.

राजापूरमध्ये राष्ट्रवादीला ३, भाजप ४, काँग्रेस २ आणि मनसेला २ ठिकाणी यश मिळाले. लांजात राष्ट्रवादीला १, काँग्रेसला १, स्थानिक पॅनेलला ३ तर साखरपा येथे एका ठिकाणी स्थानिक पॅनेल निवडून आले आहे. 
 


इतर बातम्या
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...
साडेसात हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण...नांदेड : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘ई-फेरफार प्रणालीत नाशिक विभागाची बाजी’नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीत...
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे मारता, देश...मुंबई : ‘‘दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत....
भंडाऱ्यात पणन अधिकाऱ्यांच्या समक्षच...भंडारा : जिल्ह्यात धान लागवड क्षेत्र आणि सरासरी...
वाईत हळदीला उच्चांकी भावसातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
अकोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ....अकोला : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती...मुंबई : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष...
मुंबई बाजार समितीत खरेदी-विक्री होणार...पुणे ः बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार...
महागाई विरोधात स्वाभिमानीचे लवकरच...कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने...
दोन आठवड्यांत ‘एफआरपी’चे सव्वादोन हजार...पुणे : साखरेला कमी भाव व निर्यातीत अनेक समस्या...
काजू खरेदी करताना आडकाठी केल्यास पोलिस...सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी-दोडामार्ग फळ बागायतदार...
विदर्भात कमाल तापमानात वाढपुणे ः कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू...
‘म्हैसाळ’चे पाणी बंदिस्त पाइपद्वारे...सांगली ः जलसंपदा विभागाद्वारे म्हैसाळ योजनेच्या...
कायदा मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा...उत्तूर, जि. कोल्हापूर : आधी पुनर्वसन मग धरण हा...