केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४७ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा
केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४७ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ठेवीमध्ये १,३८७ कोटींची वाढ होऊन बँकेकडे ७,१२८ कोटी रुपये ठेवी झाल्या आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी लवकरच निविदा मागवून विमा योजना सुरू करणार आहोत, असेही ते म्हणाले.    

कोल्हापुरात बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी खासदार निवेदिता माने,  पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पवार, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील-पेरीडकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास आदी संचालक व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, ‘‘सहा वर्षांपूर्वी संचालक मंडळ सत्तेवर आले. त्यावेळी १३१ कोटीचा संचित तोटा व २,८९० कोटी इतक्या ठेवीही कमी होत्या. अशा परिस्थितीत सर्व ग्राहकांनी, शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळाने व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रचंड विश्वास दाखवला. खर्चात काटकसर व पारदर्शीपणाने कारभार करीत वसुलीसाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम केल्यानेच बँकेला हे फळ मिळाले आहे. देशात नंबर एक असा, या बँकेचा लौकिक वाढवू शकलो व प्रगती करू शकलो, याचा मनापासून आनंद आहे. उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करून ही बँक देशात अव्वल बनली आहे.’’

बारा कोटींचा  प्राप्तिकर वाचला या वर्षी ३० कोटी रुपये प्राप्तिकर भरावा लागणार होता. परंतु; आयकर कायद्यातील तरतुदीनुसार गुंतवणुकीच्या तरतुदी करून १२ कोटी प्राप्तिकर टॅक्स वाचवू शकलो. डिजिटल बँकिंगमध्ये बँकेने १०० टक्के प्रगती करून ग्राहकांना हव्या त्या सगळ्या सुविधा देण्याचे काम पूर्ण केले आहे. बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा नफ्यात आहेत. खेळते भांडवल १,५२३ कोटी रुपयांनी वाढले आहे. निव्वळ एन.पी.ए. फक्त २.२० टक्के व सी.आर.ए.आर. चे प्रमाण १२.२५ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट व दोनशे कोटी नफ्याचे उद्दिष्ट आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com