agriculture news in Marathi KDCC reduced gad between village and cities Maharashtra | Agrowon

केडीसीसी’ने गाव आणि शहर ही दरी कमी केली 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली आहे.

कोल्हापूर: सर्व सुविधांनीयुक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केडीसीसी मोबाईल बँकिंग आणि अद्ययावत वेबसाइटचे लॉन्चिंग डॉ . थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. 

बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रामुख्याने शेतकरीच ग्राहक असलेल्या या बँकेने तंत्रज्ञानात गरुडभरारी घेतली आहे. आजघडीला अडीच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार किसान क्रेडिट कार्डचा वापर करीत आहेत. येत्या दोन वर्षात या बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुढे आणू, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

नोटाबंदीमध्ये रिझर्व बँकेने जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा स्वीकारल्या नाहीत. नोटा बदलून देण्याचा अधिकार सर्व बँकांना दिला, परंतु जिल्हा बँकांना दिला नाही. या अन्यायाचा सगळ्यात मोठा फटका जिल्हा बँकांना पर्यायाने शेतकऱ्यांना बसला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

यावेळी संचालक मंडळातील खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, आर. के.पोवार, अनिल पाटील, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने , आसिफ फरास यांच्यासह नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आदी प्रमुख उपस्थित होते 

प्बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी . माने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी मोबाईल बँकिंग व अद्ययावत वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी केले. आभार संचालक अनिल पाटील यांनी मानले .


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...