जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या ः उद्धव ठाकरे

Keep in mind that no one's money will be wasted: Uddhav Thackeray
Keep in mind that no one's money will be wasted: Uddhav Thackeray

मुंबई ः जो पैसा आपण खर्च करतो तो सर्वसामान्य करदात्यांचा आहे. त्यामुळे तो योजनांवर योग्य वापरला गेला नाही, तर तो पैसा उधळला, असे होईल. मला जनतेच्या पैशांची उधळपट्टी करायची नाही. याची काळजी आम्ही घेणार आहोत, याबाबत मी सचिवांच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेनेचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. याशिवाय उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतलेले मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि डॉ. नितीन राऊत हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. दुपारी अडीचच्या सुमारास पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधी सचिवांची बैठकी घेतली. त्यानंतर त्यांनी दुसरी कॅबिनेट बैठक घेतली. 

 या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला कारभारात पारदर्शकता हवी आहे. यासाठी मला पत्रकारांची मदत हवी आहे. मला तुमची मदत फक्त कोंडीत पकडण्यासाठीच नाही, तर कोंडी फोडण्यासाठीदेखील हवी आहे. मला खात्री आहे, तुम्ही जो प्रेम, जिव्हाळा दाखवला आहे, तो यापुढेही टिकून राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही सरकारचे कान, नाक आणि डोळे व्हा. सरकार केवळ घोषणा करते, मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी झाली आहे का, त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे का याची माहिती पत्रकारांकडून मिळायला हवी.

मुख्यमंत्री म्हणाले...

  • आरेला स्थगिती, आढावा घेईपर्यंत काम थांबविणार. 
  • पुढील निर्णय घेईपर्यंत एक पानही तोडले जाणार नाही.
  • मला कारभारात पारदर्शकता हवी आहे. 
  • पत्रकारांनी सरकारचे कान, नाक आणि डोळे व्हावेत.
  • सरकारची घोषणा, अंमलबजावणी, फायदा याची माहिती मिळावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com