agriculture news in marathi Keep open APMC's of state : Ajit Pawar | Agrowon

बाजार समित्या सुरूच ठेवा; उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निर्देश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे (प्रतिनिधी) ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी, कामगार संघटनांनी व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली असली तरी सरकार मात्र बाजार समित्या सुरू ठेवण्यावर ठाम आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील विविध घटकांशी संपर्क साधून शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे बजावले आहे. त्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांना दिले आहेत.    

पुणे ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी, कामगार संघटनांनी व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली असली तरी सरकार मात्र बाजार समित्या सुरू ठेवण्यावर ठाम आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील विविध घटकांशी संपर्क साधून शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे बजावले आहे. त्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांना दिले आहेत.    

कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका असल्याने व्यापाऱ्यांसह विविध घटकांनी बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका बैठका घेवून जाहीर केली होती. त्यातून भाजीपाला टंचाई, भाववाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला असता. भाववाढीला सुरवातही झाली होती. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करत संबंधितांना सुनावले आहे.  

मंगळवारी सकाळी बाजार समित्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. शहरांतील किरकोळ विक्री करणाऱ्या मंडया व बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतली. त्यामुळे अनेक शहरांतील बाजार समित्यांना मंडयांचे स्वरुप आले. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका वाढला. तो टाळण्यासाठी शहरांतील छोट्या-मोठ्या मंडया दररोज सकाळी दोन तास नागरिकांसाठी सुरू ठेवण्याची सूचना पणन खात्याने केली असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवाय पणन खात्यातर्फे राबवले जाणारे आठवडी बाजारही थोड्या मोठ्या जागेत सुरू ठेवणे शक्य आहे.

पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले तर हे बाजार सुरू करता येतील, असे संबंधितांचे म्हणणे आहे. आॅनलाईन भाजीपाला पुरवणारी संकेतस्थळे, ॲपच्या वापराला सध्या बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज उत्तर भारतातील असून ते कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे या कंपन्यांची वितरण व्यवस्था विस्कळित झाली आहे.         

बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता असल्याने लोक जादा खरेदी करू लागले आहेत. मुंबई बाजार समितीत एरवी भाज्या व फळांची चारशे-साडेचारशे वाहने येतात. मंगळवारी मात्र मागणी वाढल्याने ७०० वाहने आली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...