agriculture news in marathi Keep open APMC's of state : Ajit Pawar | Agrowon

बाजार समित्या सुरूच ठेवा; उपमुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निर्देश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे (प्रतिनिधी) ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी, कामगार संघटनांनी व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली असली तरी सरकार मात्र बाजार समित्या सुरू ठेवण्यावर ठाम आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील विविध घटकांशी संपर्क साधून शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे बजावले आहे. त्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांना दिले आहेत.    

पुणे ः कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याने व्यापारी, कामगार संघटनांनी व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका घेतली असली तरी सरकार मात्र बाजार समित्या सुरू ठेवण्यावर ठाम आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बाजार समित्यांमधील विविध घटकांशी संपर्क साधून शहरांचा भाजीपाला व फळांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व्यवहार सुरू ठेवलेच पाहिजेत, असे बजावले आहे. त्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मिळेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. बाजार समित्यांमधील गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांना दिले आहेत.    

कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका असल्याने व्यापाऱ्यांसह विविध घटकांनी बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्याची भूमिका बैठका घेवून जाहीर केली होती. त्यातून भाजीपाला टंचाई, भाववाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला असता. भाववाढीला सुरवातही झाली होती. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करत संबंधितांना सुनावले आहे.  

मंगळवारी सकाळी बाजार समित्यांमध्ये प्रचंड गर्दी झाली. शहरांतील किरकोळ विक्री करणाऱ्या मंडया व बहुतांश दुकाने बंद असल्याने नागरिकांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतली. त्यामुळे अनेक शहरांतील बाजार समित्यांना मंडयांचे स्वरुप आले. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका वाढला. तो टाळण्यासाठी शहरांतील छोट्या-मोठ्या मंडया दररोज सकाळी दोन तास नागरिकांसाठी सुरू ठेवण्याची सूचना पणन खात्याने केली असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवाय पणन खात्यातर्फे राबवले जाणारे आठवडी बाजारही थोड्या मोठ्या जागेत सुरू ठेवणे शक्य आहे.

पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले तर हे बाजार सुरू करता येतील, असे संबंधितांचे म्हणणे आहे. आॅनलाईन भाजीपाला पुरवणारी संकेतस्थळे, ॲपच्या वापराला सध्या बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज उत्तर भारतातील असून ते कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे या कंपन्यांची वितरण व्यवस्था विस्कळित झाली आहे.         

बाजार समित्या बंद राहण्याची शक्यता असल्याने लोक जादा खरेदी करू लागले आहेत. मुंबई बाजार समितीत एरवी भाज्या व फळांची चारशे-साडेचारशे वाहने येतात. मंगळवारी मात्र मागणी वाढल्याने ७०० वाहने आली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
कोल्हापुरात मजूराला प्रवासास परवानगी...कोल्हापूर  ः कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सलग...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २६...
कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा...मुंबई : सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा...
 ‘कोरोना’च्या लढ्यासाठी अशोक चव्हाण...नांदेड ः आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व...
परतूर परिसरात लॉकडाऊनमुळे टरबूज...परतूर, जि. जालना : परतूरसह परिसरातील टरबूज...
नागपूरात शेतकरी २४ ठिकाणी करणार थेट...नागपूर ः महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट)...
पुण्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
मजूर, गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा ः...परभणी ः जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींना...
जळगाव तालुक्‍यात पीक विम्याच्या...जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
नंदुरबार जिल्ह्यात केळीची वाहतूक,...नंदुरबार  : कोरोनामुळे संचारबंदी व वाहनांना...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर श्री बिरोबा...ढालगाव, जि. सांगली ः  लाखो भाविकांचे...
खानदेशात ३३५ गावांमधील शेतकऱ्यांना...जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (...
आमदार भुयार यांनी स्वतः केली गावात...अमरावती  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
येवल्यातील कांदा व्यापारी भागवताय २५०...येवला : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या...
नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार...औरंगाबाद  : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या...
रावळगावच्या भावसा जाधव यांनी गरजूंना...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
अकोला ‘झेडपी‘चा ३६ कोटींचा अर्थसंकल्प अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बैठकांना आळा...
कापशीत शेतकरी गटातर्फे भाजीपाल्याचे...अकोला ः कृषी तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा (...
साताऱ्यात जिल्हा बँकेकडून पीककर्जास ३०...सातारा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी...