मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
रेशन दुकान बंद राहिल्यास कारवाई करण्याचे आदेश
पुणे : मनमानी पद्धतीने रेशन दुकान उघडणाऱ्या दुकानदारांना शासनाने तंबी दिली आहे. नव्या आदेशानुसार रेशन दुकाने ही निर्धारित वेळेत न उघडी न ठेवल्यास आणि ग्राहकांना माल न देता परत पाठवल्यास तसेच दर्शनी भागात सूचना फलक न लावल्यास कारवाई करण्याचे आदेश अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
पुणे : मनमानी पद्धतीने रेशन दुकान उघडणाऱ्या दुकानदारांना शासनाने तंबी दिली आहे. नव्या आदेशानुसार रेशन दुकाने ही निर्धारित वेळेत न उघडी न ठेवल्यास आणि ग्राहकांना माल न देता परत पाठवल्यास तसेच दर्शनी भागात सूचना फलक न लावल्यास कारवाई करण्याचे आदेश अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
राज्यातील गरीब, गरजून तसेच पात्र लाभार्थ्यांना निवडक जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था हे एक माध्यम आहे. दुकानदाराकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वेळेत नियमित आणि दररोज वाटप होत नसल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणात विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारी टाळण्यासाठी शासनाने नऊ मार्च रोजी परिपत्रक काढून रेशन दुकानदारांना दुकान संपूर्ण वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रेशन दुकानदारांकडून ग्राहकोपयोगी वस्तूचे वाटप सुस्थिती होण्यासाठी दुकाने सकाळी व दुपारी प्रत्येकी चार तास उघडी ठेवण्यात यावीत. स्थानिक परिस्थितीनुसार या बाबतच्या नेमकी वेळ अप्पर जिल्हाधिकारी, नियंत्रण शिधा वाटप मुंबई यांनी निश्चित कराव्यात असे आदेशात म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो, अशा ठिकाणी आठवडा बाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत. विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या ठिकाणी त्याच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी रास्त भाव, शिधावाटप दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत आदि सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त संसदीय लोकलेखा समितीने केलेल्या सूचना आणि नियंत्रण आदेश २०१५ च्या कलम दहा मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनेचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा शासनाने परिपत्रकातून दिला आहे.
दुकानातील फलकावर वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मूल्य, अन्नधान्याची पात्रता, दुकान उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, काही तक्रार असल्यास ती कोणत्या अधिकाऱ्याकडे कराव्यात, या बाबतची माहिती तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी माहिती फलकावर देणे बंधनकारक आहे. महिन्याच्या कोणत्याही दिवशी म्हणजे महिन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लाभधारक रेशन दुकानात रेशन घेण्यास आल्यास त्याला दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
- 1 of 1022
- ››