agriculture news in Marathi, In Kerala, the arrival of banana increased, the rate was stable | Agrowon

जळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 मार्च 2019

जळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती केळीचे दर ९३० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. मागील पंधरवड्यात दरात फारशी पडझड झालेली नाही. रावेर, यावल व मुक्‍ताईनगर भागांत मिळून रोज १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा होत आहे. पुढे आवकेत वाढ होईल, असे चित्र आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती केळीचे दर ९३० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. मागील पंधरवड्यात दरात फारशी पडझड झालेली नाही. रावेर, यावल व मुक्‍ताईनगर भागांत मिळून रोज १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा होत आहे. पुढे आवकेत वाढ होईल, असे चित्र आहे. 

नवती केळीची आवक रावेर, यावल, मुक्ताईनगर, भडगाव व पाचोरा भागांत सुरू आहे. कांदेबाग केळीची कापणी जवळपास पूर्ण झाली आहे. कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर करणे रावेर बाजार समितीने थांबविले आहे. पिलबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर केले जात असून, पिलबाग केळीसही कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर आहेत. 

फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील केळीचे एजंट, पुरवठादार यांच्याकडून बॉक्‍समध्ये पॅकिंगच्या केळीची मागणी वाढू लागली आहे. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात बॉक्‍समधील केळीची मागणी आहे. सध्या रावेर, मुक्ताईनगर व यावलमध्ये दर्जेदार केळी कापणीसाठी उपलब्ध होत आहे. परंतु, दर अपेक्षित प्रमाणात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात फक्त यावल व मुक्ताईनगर भागांत केळीचा पुरवठा सुरू होता. 

या महिन्यात मध्य रावेर व तापीकाठावरील गावांमधून केळीचा पुरवठा सुरू झाल्याने आवक प्रतिदिन २० ट्रकने वाढली आहे. परदेशातील केळी निर्यात अजून सुरू झालेली नाही. परंतु, काही निर्यातदार कंपन्यांच्या एजंटनी रावेर व यावल भागात शेतकऱ्यांशी संपर्क साधला आहे. निर्यात सुरू झाल्यास दरात वाढ अपेक्षित आहे. पंजाब, दिल्ली व उत्तरेकडील इतर राज्यांमध्ये रोज ९० ते ९५ ट्रक केळीची पाठवणूक केली जात आहे. तर कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक क्रेटमध्ये भरून छत्तीसगड, नागपूर व राजस्थान भागांत केली जात आहे. 

या केळीला ८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. जळगाव, चोपडा, जामनेर भागांतील कांदेबाग केळीची काढणी जवळपास पूर्ण झालेली आहे. उशिरा लागवडीच्या बागांमधील केळीची पाठवणूक कल्याण, ठाणे, पुणे भागांत केली जात असल्याचे सांगण्यात आले.

हरभरा दर स्थिर, तूर दरात घसरण
हरभरा दर ३७०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत आहेत. अमळनेर, चोपडा व पाचोरा येथील बाजारात हरभऱ्याची बऱ्यापैकी आवक होत आहे. तर तुरीचे दर मात्र ४३०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. तुरीची बाजारातील आवक कमी असतानाही दरांवर दबाव आहे. तुरीची फक्त मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व अमळनेर येथील बाजारात आवक होत आहे. हरभऱ्याची जळगाव बाजार समितीत प्रतिदिन १४० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...