agriculture news in marathi Kerala Assembly passes resolution against Centre's Farm laws | Page 2 ||| Agrowon

केरळमध्ये कृषी कायद्यांना डच्चू; भाजप आमदाराचेही समर्थन 

अजय कुमार ः सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. 

केरळ :केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. 

भाजपच्या या एकमेव आमदारानेही या विधेयकाला समर्थन दिले. कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियानातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन करीत असताना हे कायदे राज्यात लागू करण्याविरोधातील विधेयक केरळ सरकारने मंजूर केले. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन गुरूवारी (ता.31) बोलाविण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सभागृहात विधेयक मांडले.

सत्तारूढ डाव्या पक्षांची आघाडी (एलडीएफ), काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांचा या विधेयकाला पाठिंबा होताच. भाजपच्या एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी विधेयकाला समर्थन दिल्याने सभागृहातील उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. याबाबत ते म्हणाले की, हे विधेयक सर्वसहमतीने मंजूर झाले आहे.

विधेयकातील काही मुद्दांबाबत मतभेद असल्याने त्याबाबत माझे विचार सभागृहात मांडले आहेत. माझा या विधोयकाला पूर्ण पाठिंबा असून सभागृहातील सार्वमताला माझा पाठिंबा आहे. ही लोकशाहीची भावना असून केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

उद्योजकांच्या भल्यासाठी कायदे 
विजयन म्हणाले की, कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलन यापुढेही सुरू राहिले तर केरळमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील. अन्य राज्यांमधून केरळला अन्नधान्याच्या पुरवठा झाला नाही तर राज्याला उपाशी राहावे लागेल. केद्राचे हे कायदे उद्योजकांच्या भल्‍यासाठी आहेत. हे कायदे अंमलात आणल्यास शेतकऱ्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होईल आणि त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला होईल, अशी टीका त्यांनी केली. देश एका कठीण परिस्थितून जात आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांच्याबरोबर उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असेही विजयन म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...