केरळला १०० कोटींची मदत

केरळला १०० कोटींची मदत
केरळला १०० कोटींची मदत

कोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई पाहणी केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज  तातडीची शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यांत पुरामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३७ वर पोचली आहे.  केरळ सरकारने रविवारी (ता.१२) केंद्राकडे १ हजार २२० कोटी रुपयांचा मदतनिधी मागितला. या पुरामुळे राज्याचे ८ हजार ३१६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, शनिवारी केरळला अतिवृष्टीपासून काहीसा दिलासा मिळाला. मुख्य धरणांतील पाण्याची पातळी खालावली असली तरीसुद्धा राज्यातील हायअलर्ट कायम आहे. चार जिल्ह्यांतील साठ हजार लोकांना पुनर्वसन छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.  पुढील तीन दिवसांमध्ये इडुक्की, एर्नाकुलम, पलक्कड, वायनाड, मलप्पुरम, कोझीकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे राज्य सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. चेन्नीथाला यांची मागणी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी केंद्राने तातडीने केरळला अतिरिक्त मदत पुरवावी, अशी मागणी केली आहे. राज्याला चार हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज दिले जावे, असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केरळ मदत देण्याची विनंती केली होती. यामुळे केंद्रावरील दबाव वाढला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com