केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा उत्पादन घटणार

यंदा मराठवाड्यातील गावरान आंब्याबरोबरच केसर आंब्याची चवही दुर्मिळ होते की काय, असे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केसर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे.
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा उत्पादन घटणार
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा उत्पादन घटणार

औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर आलाच नाही. कुठे लगडला तर टिकला नाही आणि टिकला तो नैसर्गिक संकटाच्या सत्रात सापडला. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील गावरान आंब्याबरोबरच केसर आंब्याची चवही दुर्मिळ होते की काय, असे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केसर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे. गुजरात केसरच्या तुलनेत उशिरा येणाऱ्या परंतु विशिष्ट गंध व चवीने सर्वांनाच भुरळ पाडणाऱ्या मराठवाड्यातील केसरची वाट प्रत्येक जण आतुरतेने पाहत असतो. परंतु यंदा मराठवाड्याच्या केसर विषयीचीही सर्वांचीच आतुरता ताणली जाण्याची शक्‍यता आहे. आंब्यासाठी यंदा कायम प्रतिकूल राहिलेले हवामान त्याला कारणीभूत ठरले आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती. त्यांनतर पावसाळ्याच्या सुरुवातीला न पडलेला पाऊस व नंतरचा लहरीपणा, ऑक्टोबरमध्ये अवकाळी व अतिवृष्टी यामुळे सर्वच फळपिकांचे ताळतंत्र बिघडले. आंबा ही त्याला अपवाद ठरला नाही.  यंदा गावरान आंब्यांना मोहरच लगडला नाही. ज्यांना लगडला तो अल्पप्रमाणात तर काही ठिकाणी लगडल्या नंतर अवकाळी पावसाच्या सपाट्यात सापडून गळून गेला. केसर आंब्याची ही अवस्था अशीच काहीशी झाली. त्यामुळे अपवादात्मक केसर आंबा बागांना मोहर लगडल्याचे व लगडलेल्या मोहराचे फळात रुपांतरीत होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. 

प्रतिक्रिया... लगडलेले मोहर कैरीत परावर्तित होत असताना अवकाळी पावसाने घात केला. २८५ झाड आता नुसती उभी आहेत. विमा उतरविला पण साईड बंद असल्याने कंपनीला कळविता येईना. कुणी दखल घ्यायलाही इकडे नाही. - गवनाजी अधाने, विरमगाव, जि. औरंगाबाद

दुष्काळाच्या आघाताने साडेतीन हजार आंबा झाडांची बाग केवळ दोनशे झाडापुरती मर्यादित झाली. थोडीबहुत लागलेली फळ बोराएवढे होऊन गळताहेत. यंदा घरच्या आंब्याचा रस खायला मिळतो की नाही हा प्रश्न आहे. - संजय पाटील मोरे, नळविहिरा, जि. जालना यंदा आमची केसर आंबा बाग व्यवस्थापनाने बऱ्यापैकी आली. आमच्या भागातल्या जवळपास ८० टक्के आंबा बागा गेल्यात. - तानाजी वाडीकर, नागलगाव. ता. उदगीर, जि. लातूर यंदा केसर बागेत फळ लागडली पण अवकाळी पावसाने ५०  टक्के गळाली. उत्पादन येईपर्यंत हवामान कसे राहते यावर सर्व अवलंबून आहे. - सुशील बदलवा, आंबा उत्पादक, पैठण, जि. औरंगाबाद एक हजार आंबा झाडांपैकी केवळ दहा झाडांना मोहर लागला. तो ही टिकेना. आमच्या भागात आंबाच काय चिंचाही आल्या नाही. - पृथ्वीराज तत्तापुरे, आंबा उत्पादक, लातूर  ८० टक्क्यांपर्यंत फटका  उशिराने आलेल्या मोहरामुळे यंदा केसरचा हंगामही जवळपास महिनाभर लांबण्याची चिन्हे असल्याचे तज्ञ सांगतात. दुसरीकडे मोहराचे रूपांतर सुपारी एवढ्या कैरीत होत असतानाच आलेल्या वादळ पावसाचा बहुतांश आंबा बागांना फटका बसला. कुठे पन्नास टक्के तर कुठे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळे गळून पडली. त्यामुळे यंदा मराठवाड्यात केसर आंबा उत्पादनाला अपवादात्मक बागा वगळता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचे आंबा उत्पादक सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com