agriculture news in marathi kesar Mango production will affected this year | Agrowon

केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा उत्पादन घटणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

यंदा मराठवाड्यातील गावरान आंब्याबरोबरच केसर आंब्याची चवही दुर्मिळ होते की काय, असे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केसर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे.

औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर आलाच नाही. कुठे लगडला तर टिकला नाही आणि टिकला तो नैसर्गिक संकटाच्या सत्रात सापडला. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील गावरान आंब्याबरोबरच केसर आंब्याची चवही दुर्मिळ होते की काय, असे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केसर आंब्याचे क्षेत्र विस्तारले आहे.

गुजरात केसरच्या तुलनेत उशिरा येणाऱ्या परंतु विशिष्ट गंध व चवीने सर्वांनाच भुरळ पाडणाऱ्या मराठवाड्यातील केसरची वाट प्रत्येक जण आतुरतेने पाहत असतो. परंतु यंदा मराठवाड्याच्या केसर विषयीचीही सर्वांचीच आतुरता ताणली जाण्याची शक्‍यता आहे. आंब्यासाठी यंदा कायम प्रतिकूल राहिलेले हवामान त्याला कारणीभूत ठरले आहे. गतवर्षी दुष्काळी स्थिती. त्यांनतर पावसाळ्याच्या सुरुवातीला न पडलेला पाऊस व नंतरचा लहरीपणा, ऑक्टोबरमध्ये अवकाळी व अतिवृष्टी यामुळे सर्वच फळपिकांचे ताळतंत्र बिघडले. आंबा ही त्याला अपवाद ठरला नाही. 

यंदा गावरान आंब्यांना मोहरच लगडला नाही. ज्यांना लगडला तो अल्पप्रमाणात तर काही ठिकाणी लगडल्या नंतर अवकाळी पावसाच्या सपाट्यात सापडून गळून गेला. केसर आंब्याची ही अवस्था अशीच काहीशी झाली. त्यामुळे अपवादात्मक केसर आंबा बागांना मोहर लगडल्याचे व लगडलेल्या मोहराचे फळात रुपांतरीत होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. 

प्रतिक्रिया...
लगडलेले मोहर कैरीत परावर्तित होत असताना अवकाळी पावसाने घात केला. २८५ झाड आता नुसती उभी आहेत. विमा उतरविला पण साईड बंद असल्याने कंपनीला कळविता येईना. कुणी दखल घ्यायलाही इकडे नाही.
- गवनाजी अधाने, विरमगाव, जि. औरंगाबाद

दुष्काळाच्या आघाताने साडेतीन हजार आंबा झाडांची बाग केवळ दोनशे झाडापुरती मर्यादित झाली. थोडीबहुत लागलेली फळ बोराएवढे होऊन गळताहेत. यंदा घरच्या आंब्याचा रस खायला मिळतो की नाही हा प्रश्न आहे.
- संजय पाटील मोरे, नळविहिरा, जि. जालना

यंदा आमची केसर आंबा बाग व्यवस्थापनाने बऱ्यापैकी आली. आमच्या भागातल्या जवळपास ८० टक्के आंबा बागा गेल्यात.
- तानाजी वाडीकर, नागलगाव. ता. उदगीर, जि. लातूर

यंदा केसर बागेत फळ लागडली पण अवकाळी पावसाने ५०  टक्के गळाली. उत्पादन येईपर्यंत हवामान कसे राहते यावर सर्व अवलंबून आहे.
- सुशील बदलवा, आंबा उत्पादक, पैठण, जि. औरंगाबाद

एक हजार आंबा झाडांपैकी केवळ दहा झाडांना मोहर लागला. तो ही टिकेना. आमच्या भागात आंबाच काय चिंचाही आल्या नाही.
- पृथ्वीराज तत्तापुरे, आंबा उत्पादक, लातूर 

८० टक्क्यांपर्यंत फटका 
उशिराने आलेल्या मोहरामुळे यंदा केसरचा हंगामही जवळपास महिनाभर लांबण्याची चिन्हे असल्याचे तज्ञ सांगतात. दुसरीकडे मोहराचे रूपांतर सुपारी एवढ्या कैरीत होत असतानाच आलेल्या वादळ पावसाचा बहुतांश आंबा बागांना फटका बसला. कुठे पन्नास टक्के तर कुठे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळे गळून पडली. त्यामुळे यंदा मराठवाड्यात केसर आंबा उत्पादनाला अपवादात्मक बागा वगळता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचे आंबा उत्पादक सांगतात.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...