खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी आवर्तन

खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी आवर्तन
खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी आवर्तन

शेटफळगढे, जि. पुणे : खडकवासला कालव्याद्वारे ९ सप्टेंबरपासून इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले आवर्तन मंगळवारी (ता. १०) शेटफळगढे परिसरात पोचले. तालुक्‍याच्या शेवटच्या सिंचित क्षेत्रापर्यंत हे आवर्तन पोचण्यास आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनाच्या गरजेच्या वेळी हे आवर्तन आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

यावर्षी पावसाचे चारही महिने जवळपास कोरडे गेल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. मात्र खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणी झालेला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील  शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र धरणे शंभर टक्के भरल्यानंतर अतिरिक्‍त पाण्याचा विसर्ग सुरू असताना बारामती व पुरंदर तालुक्‍यातील जानाई शिरसाई योजनेसाठी पाणी देण्याची प्रकल्पाच्या पाणी वाटपात तरतूद करण्यात आलेली आहे. 

अशातच या योजनेशी संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे धरणातील अतिरिक्त विसर्गाचे पाणी या योजनेसाठी सोडण्यात आले होते. त्यामुळे मागील ३० दिवसांपासून धरणे शंभर टक्के भरूनही इंदापुरात आवर्तन येऊ शकत नव्हते. या मुद्यावरून तालुक्‍यातील राजकारण चांगलेच तापले होते.

रखडलेल्या उसाच्या लागवडी होणार  शेती सिंचनासाठी ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी दिले जाणार असून, कालव्याच्या सर्व वितरिकाही पाणी सोडले जाणार आहे. तसेच कालव्याच्या लाभक्षेत्रातील तलावातही काही प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे. मात्र या आवर्तनामुळे मागील जुलै महिन्यापासून रखडलेल्या उसाच्या लागवडी होणार आहेत. तसेच ऊस, मका, कडवळ या उभ्या पिकांनाही या आवर्तनाचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com