Agriculture news in Marathi, Khadakwasal sent water to Indapur | Agrowon

खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी आवर्तन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शेटफळगढे, जि. पुणे : खडकवासला कालव्याद्वारे ९ सप्टेंबरपासून इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले आवर्तन मंगळवारी (ता. १०) शेटफळगढे परिसरात पोचले. तालुक्‍याच्या शेवटच्या सिंचित क्षेत्रापर्यंत हे आवर्तन पोचण्यास आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनाच्या गरजेच्या वेळी हे आवर्तन आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

शेटफळगढे, जि. पुणे : खडकवासला कालव्याद्वारे ९ सप्टेंबरपासून इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले आवर्तन मंगळवारी (ता. १०) शेटफळगढे परिसरात पोचले. तालुक्‍याच्या शेवटच्या सिंचित क्षेत्रापर्यंत हे आवर्तन पोचण्यास आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनाच्या गरजेच्या वेळी हे आवर्तन आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

यावर्षी पावसाचे चारही महिने जवळपास कोरडे गेल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. मात्र खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणी झालेला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील 
शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत होते. मात्र धरणे शंभर टक्के भरल्यानंतर अतिरिक्‍त पाण्याचा विसर्ग सुरू असताना बारामती व पुरंदर तालुक्‍यातील जानाई शिरसाई योजनेसाठी पाणी देण्याची प्रकल्पाच्या पाणी वाटपात तरतूद करण्यात आलेली आहे. 

अशातच या योजनेशी संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे धरणातील अतिरिक्त विसर्गाचे पाणी या योजनेसाठी सोडण्यात आले होते. त्यामुळे मागील ३० दिवसांपासून धरणे शंभर टक्के भरूनही इंदापुरात आवर्तन येऊ शकत नव्हते. या मुद्यावरून तालुक्‍यातील राजकारण चांगलेच तापले होते.

रखडलेल्या उसाच्या लागवडी होणार 
शेती सिंचनासाठी ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी दिले जाणार असून, कालव्याच्या सर्व वितरिकाही पाणी सोडले जाणार आहे. तसेच कालव्याच्या लाभक्षेत्रातील तलावातही काही प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे. मात्र या आवर्तनामुळे मागील जुलै महिन्यापासून रखडलेल्या उसाच्या लागवडी होणार आहेत. तसेच ऊस, मका, कडवळ या उभ्या पिकांनाही या आवर्तनाचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...