agriculture news in marathi, khadakwasla, kalmodi dam become overflow, pune, maharashtra | Agrowon

खडकवासला, कलमोडी धरण भरले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

पुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून, धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये जवळपास ८२ टीएमसी (३८ टक्के) पाणी साठा झाला आहे.

पुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून, धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये जवळपास ८२ टीएमसी (३८ टक्के) पाणी साठा झाला आहे.

खडकवासला, कलमोडी धरण १०० टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. खडकवासला धरणातून हंगामात प्रथमच १९ हजार क्युसेक तर कलमोडीतून ४७०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. खडकवासला धरण यंदा हंगामात प्रथमच ओव्हरफ्लो झाले असून, सकाळी आठ वाजता धरणातून नदीपात्रात १७०० क्युसेक तर कालव्यात १००० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरवात झाली. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी सहा वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून मुठा नदीपात्रात आणि कालव्यात सुमारे २० हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.

खडकवासला १०० टक्के भरले (Video)

कलमोडी धरणातून आरळा नदीपात्रात ४७०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडज धरणातून मीना नदीमध्ये २३६६, वडीवळे धरणातून इंद्रायणी नदीत सुमारे चार हजार तर गुंजवणी धरणातून ६६२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते.  वडज, चासकमान, भामाअसखेड, भाटघर धरणात ५० तर वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, गुंजवणी या धरणांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.

सोमवारी (ता.१६) जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पडलेला पाऊस (मिमी) : टेमघर १०७, वरसगाव ८९, पानशेत ९०, खडकवासला २७, पवना १५४, कासारसाई ३२, मुळशी ११६, कलमोडी ७०, चासकमान ४२, भामा असखेड २५, आंद्रा ६०, वडीवळे १०२, गुंजवणी ४२, भाटघर ३२, निरा देवघर ९२, वीर ६, नाझरे १, पिंपळगाव जोगे ४९, माणिकडोह ६०, येडगाव ५२, वडज ४२, डिंभे ६०.

इतर अॅग्रो विशेष
विघ्नकर्ता नव्हे, विघ्नहर्ता बना! स ध्या देशापुढे गंभीर असे आर्थिक संकट उभे आहे....
‘लष्करी’ हल्लाचालू खरीप हंगामात अमेरिकी लष्करी अळी (फॉल आर्मी...
जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर...शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा (जि....
मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वलरत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र...
दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची...कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान...
निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच...बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच...
मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळपरभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही...
पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढलापुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे...
द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळीभवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...