agriculture news in marathi, Khamgaon agriculture committee dismissed | Agrowon

खामगाव बाजार समिती बरखास्त; प्रशासक कृपलानींकडे 'चार्ज'

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जुलै 2019

बुलडाणा : जिल्ह्यातील मोठी उलाढाल असलेल्या खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. कामकाजात अनियमितता तसेच पणन नियमांच्या आदेशांचे पालन न केल्याने तातडीच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही बाजार समिती बरखास्तीचे आदेश दिले. 

बुलडाणा : जिल्ह्यातील मोठी उलाढाल असलेल्या खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. कामकाजात अनियमितता तसेच पणन नियमांच्या आदेशांचे पालन न केल्याने तातडीच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही बाजार समिती बरखास्तीचे आदेश दिले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बाजार समितीचे प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना बाजार समितीतील वजनकाटे अपहारप्रकरणी ६ मे २०१७ रोजी पोलिसांनी अटक केली होती. या वेळी त्यांना न्यायालयाने प्रथम एक दिवसाची व नंतर चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. सलग ४८ तासांपेक्षा अधिक काळ ते पोलीस कोठडीमध्ये असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने त्यांच्याविरुद्ध कर्मचारी सेवानियमातील तरतुदीनुसार कार्यवाही केली नव्हती. त्यांना बाजार समितीच्या सेवेमधून निलंबित करण्याचे टाळले होते. 

याप्रकरणी नंदलाल भट्टड यांनी राज्याच्या पणन संचालकांकडे तक्रार करीत दिलीप देशमुख यांना सेवेमधून मुक्त करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालकांनी बाजार समितीला देशमुख यांच्याविरुद्ध कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियम १९६७ मधील तरतुदीनुसार कारवाई करून अर्जदार भट्टड व पणन कार्यालयाला त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. शिवाय दिलीप देशमुख यांना निलंबित न करता त्यांच्याकडून प्रभारी सचिव पदाचा पदभारही काढला नव्हता. ही बाब सेवानियमातील तरतुदीचा भंग करणारी ठरली. सोबतच सेवाज्येष्ठता यादीतही संचालक मंडळाने घोळ केल्याचा आरोप होता.  

नियमानुसार सेवाजेष्ठ कर्मचारी मु. शा. भिसे हे सचिव पदासाठी पात्र असताना त्यांना दिलेला पदभार काढून पुन्हा दिलीप देशमुख यांना बहाल करण्यात आला. अशा प्रकारे बाजार समिती संचालक मंडळाने निर्देशांचे पालन करण्यात कसूर केला. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी (ता. २४) आदेश काढत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले. बाजार समितीवर सहायक निबंधक (नांदुरा) एम. ए. कृपलानी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. 

सत्ताकेंद्राला सुरुंग
खामगाव बाजार समितीवर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांची वर्षानुवर्षे पकड आहे. सध्या ही मोठी संस्था त्यांच्याजवळ होती. मात्र आता बरखास्तीची कारवाई झाल्याने सानंदा पुढचा काय पवित्रा घेतात याबाबत चर्चा सुरू आहेत.


इतर ताज्या घडामोडी
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...