Agriculture news in marathi Of Khamgaon Market Committee Symbolic fast against stewardship | Agrowon

खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध लाक्षणिक उपोषण 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक गैरकारभाराबाबत नंदलाल भट्टड यांनी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती गठित केली आहे.

बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक गैरकारभाराबाबत नंदलाल भट्टड यांनी वेळोवेळी संबंधितांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती गठित केली आहे. चौकशीमध्ये तक्रारीत सत्यता आढळून आलेली आहे. पुर्तता अहवालाबाबत वरिष्ठांच्या आदेशाला बाजार समिती गांभीर्याने घेत नसल्याने तक्रारदार नंदलाल भट्टड यांनी बुधवारी (ता.२८) येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. 

भट्टड यांनी १० जुलैला संबंधितांना पत्र देऊन लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. शासनाने २०१६-१७मध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान जाहीर केले होते. मात्र बाजार समितीच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या गैरकारभारामुळे अनेक शेतकरी सदर योजनेपासून वंचित राहिले आहेत.

विनापरवाना अडत चालविणे, हिशोबपट्टी कमी दराची व बिले जास्त दराचे, अनेक हिशोबपट्ट्यांची बिले नाहीत, असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. बाजार समितीतून कोट्यवधी रुपयांचा माल विना गेटपास व विना बिलाचा बाहेर कशा पद्धतीने जातो. ज्याचा सेस सुद्धा बाजार समितीला प्राप्त होत नाही. बाजार समिती बाबतीत चौकशी होऊन कार्यवाहीचे आदेश आल्यानंतरही सदर प्रकरण राजकीय दबावातून दाबले जात आहे, असा आरोप भट्टड यांनी केला आहे. 

अकोट बाजार समितीचे सचिव निलंबित
अकोट, जि. अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. बाजार समितीत आर्थिक अनियमिततेचा ठपका माळवे व लेखापाल मंगेश बोंद्रे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आला असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. प्रशासक राजेंद्र पालेकर यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे.

बाजार समितीमध्ये हिशेब ठेवणे, देखरेख तसेच नियंत्रणात्मक कामाकडे माळवे यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत प्रशासकीय कामे बिनचूक करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु ती जबाबदारी पार पाडण्यास कसूर केल्यामुळे प्रशासकीय कार्यवाही करून विभागीय चौकशी करणे क्रमप्राप्त झाल्याचे म्हटले आहे. माळवे यांना निलंबित करून निलंबन कालावधीत चोहोट्टा बाजार येथील उपबाजार समिती कार्यालयात दैनंदिनरीत्या उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
 

 

 
 


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...