agriculture news in marathi, Khandesh Agriculture university subject again on agenda | Page 3 ||| Agrowon

खानदेशात कृषी विद्यापीठाचा मुद्दा ऐरणीवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

जळगाव ः खानदेशात कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच कृषी विद्यापीठ जळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनेने केली आहे. तर कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, अशी मागणी विद्यापीठ कृती समितीने केली आहे. 

जळगाव ः खानदेशात कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच कृषी विद्यापीठ जळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनेने केली आहे. तर कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, अशी मागणी विद्यापीठ कृती समितीने केली आहे. 

धुळे जिल्हा तसा लहान आहे. धुळ्यात कृषी महाविद्यालये अनेक वर्षांपासून आहेत. जळगाव मोठा जिल्हा असून, केळी, कपाशी, दूध उत्पादन व प्रक्रिया उद्योगांमध्ये जळगाव पुढे जात आहे. जागाही जळगाव जिल्ह्यात मिळू शकते. कृषी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने जळगावात सामर्थ्य असून, जळगावातच कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे कडूअप्पा पाटील, प्रगतिशील शेतकरी शशिकांत पाटील (केऱ्हाळे, जि. जळगाव) यांनी केली आहे.

कृषी विद्यापीठ जळगाव जिल्ह्यातच व्हावे यासाठी शेतकरी संघटना व काही प्रगतिशील शेतकरी मुख्यमंत्री, जलसंपदांत्री, कृषिमंत्री व माजी मंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली. 

कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यात स्थापन करावे यासाठी सोमवारी धुळे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मरण धरणे आंदोलन केले. शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. नगर)चे विभाजन करून चार जिल्ह्यांसाठी कृषी विद्यापीठ उभारण्यासंबंधीच्या डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी कृती समितीने धरणे आंदोलन करताना केली.

धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास अनुकूल वातावरण असताना राहुरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन केले. या मागणीसाठी येत्या २१ जानेवारी रोजी २०१६ धुळे जिल्ह्यातील सर्व कृषी महाविद्यालये बंद करून विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ धुळ्यात स्थापन करण्याची मागणी केली होती. 

इतर ताज्या घडामोडी
सात हजार जलस्रोतांचे होणार चंद्रपूर...चंद्रपूर ः ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक...
राधाकृष्ण विखे-थोरात यांच्यात रंगणार...नगर ः राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत...
नगर जिल्ह्यात दक्षिणेत दुष्काळ अन्‌...नगर ः उत्तरेतील भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा...
जनावरांच्या मृत्यूने धनगरवाडा चिंतेतढेबेवाडी, जि. सातारा : धनगरवाडा (कसणी, ता. पाटण)...
माण तालुक्यात कांदा काढणी वेगातगोंदवले, जि. सातारा : निवडणुकीच्या सुगीतच शेतीची...
विद्यार्थिनीशी गैरवर्तणूकप्रकरणी दोन...नागपूर ः विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करण्याचा...
मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतील १०६...लातूर : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नांदेड, परभणीत ऊस लागवडी वाढण्याची...नांदेड ः गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे...
नांदेड : परतीच्या पावसाने सोयाबीनचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बागलाण तालुक्यातील वादळाने द्राक्ष...नाशिक : पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादकांचा भाग...
लाल कांदा लागवड खानदेशात घटलीजळगाव ः खानदेशात खरिपातील लाल कांद्याची लागवड...
नव्या हंगामातील पपई लवकरच बाजारात;...जळगाव  ः नव्या हंगामातील पपईची काढणी येत्या...
शासकीय हमीभाव केंद्र सुरू करा ः सोयाबीन...दारव्हा, यवतमाळ  ः बाजारात नव्या सोयाबीनची...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर कायमसिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग...
जत सीमा भागाला कर्नाटकातून पाणी देणार...जत, जि. सांगली : ‘‘दुष्काळी जत तालुक्‍याच्या...
‘मार्केट यार्डातून हळद न उचलणाऱ्या...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
मोदींच्या चुकीच्या धोरणांची किंमत...अकोला ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवीत...
गुजरातच्या सोईचे निर्णय घेतले जातात ः...यवतमाळ : गुजरातकडून येणाऱ्या सूचनांचेच पालन...
दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा आमचा अजेंडा...सोलापूर ः सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला...