खानदेशातील प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

खानदेशातील प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
खानदेशातील प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

जळगाव ः खानदेशात काही प्रकल्पांचा अपवाद वगळता अनेक प्रमुख मध्यम व मोठे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (ता. २७) सुरूच होता. 

जळगाव जिल्ह्यात मोर, हतनूर, गूळ, अंजनी, बहुळा, बोरी, वाघूर, गिरणा, सुकी, गारबर्डी आदी प्रकल्पांमध्ये आवक सुरूच असल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. हिवरा, तोंडापूर, अभोरा, मंगरूळ हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. फक्त मन्याड व भोकरबारी या प्रकल्पांमधील साठा २० टक्‍क्‍यांपर्यंतदेखील पोचलेला नाही. धुळे जिल्ह्यातील कनोली व सोनवद हे प्रकल्प अद्याप पूर्ण भरलेले नाहीत. परंतु, त्यातील साठा समाधानकारक आहे. तर पांझरा, अमरावती, बुराई, जामखेडी, मालनगाव, करवंद हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू झाला. सध्या अनेर, पांझरा, जामखेडी व अमरावती प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. नंदुरबारमधील दरा, शिवन व रंगावली प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या सर्व प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. तर शहादानजीकच्या सुसरी नदीवरील लघु प्रकल्पातूनही विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव, धुळे व नंदुरबारमधील सातपुडा पर्वतानजीकचे सर्व लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर कमाल नद्यांनाही मोठे प्रवाही पाणी आले आहेत. जळगाव जिल्ह्यात अंजनी, बहुळा, सुकी, भोकरी, मोर आदी लहान नद्यांसह तापी, वाघूर व गिरणा नदीलाही प्रवाही पाणी आले आहे. धुळ्यातील पांझरा, अनेर, जामखेडी आदी नद्यांनाही पूरस्थिती आहे. तर नंदुरबारमधील रंगावली, सातपुड्यातील उदय, सुसरी, गोमाई नदीलाही पूरस्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com