Agriculture news in marathi In Khandesh, the area of ​​millet will grow | Agrowon

खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

जळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार आहे. यातच बियाण्यांबाबत कृषी विभागाने व्यवस्थित नियोजन न केल्याने हवे ते किंवा अपेक्षित वाण बाजारात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे चित्र आहे. 

जळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार आहे. यातच बियाण्यांबाबत कृषी विभागाने व्यवस्थित नियोजन न केल्याने हवे ते किंवा अपेक्षित वाण बाजारात उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे चित्र आहे. 

बाजरी पेरणीची लगबग मागील आठवडाभरापासून खानदेशात सुरू आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, जळगावमधील पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, चोपडा, जळगाव, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा या भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी होईल, असा अंदाज कृषी विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता. खानदेशात रब्बीमध्ये दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरवर बाजरीची पेरणी केली जाते. यंदा ही पेरणी सुमारे आठ ते साडेआठ हजार हेक्‍टरपर्यंत जाऊ शकते. कारण अनेक शेतकरी कापसाखालील व इतर पिकांखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बाजरीची पेरणी करीत आहेत. काही शेतकरी कांदेबाग केळीची काढणी ९० टक्के झालेल्या क्षेत्रात बाजरी पेरणी करीत आहेत. चारा व धान्य चांगले उपलब्ध होईल व त्यास दरही चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

बाजरीला मागील हंगामात प्रतिक्विंटल २१०० रुपये दर जळगाव, धुळे व चोपडा येथील बाजारात मिळाला होता. तसेच चाऱ्यालाही दर टिकून होते. यंदा खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने चारा हवा तेवढा नाही. यामुळे चाऱ्याची साठवणूक पुढे महाग होऊ शकते. यासाठीदेखील अनेक शेतकरी बाजरी पेरणी करीत आहेत. सध्या धुळे, साक्री, शिंदखेडा या भागातील पेरणी ६० टक्‍क्‍यांवर झाली आहे. तर चोपडा, जळगाव, शहादा या भागातील पेरणी सुरू आहे. बियाण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार किंवा खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. यातच हव्या त्या किंवा अपेक्षित कंपनीचे वाण बाजारात मिळत नसल्याची स्थिती आहे. जळगाव, चोपडा, शहादा येथील बाजारात वाणांचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...