खानदेशात लहान केळी बागा होरपळू लागल्या

जळगाव ः खानदेशात कमाल तापमान दिवसागणिक वाढत असून, केळी पिकाला मोठा फटका बसत आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज अधिक असून, शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.
In Khandesh, banana orchards Began to dry up due to the sun
In Khandesh, banana orchards Began to dry up due to the sun

जळगाव ः खानदेशात कमाल तापमान दिवसागणिक वाढत असून, केळी पिकाला मोठा फटका बसत आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज अधिक असून, शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. 

खानदेशात मागील ऑक्‍टोबर ते डिसेंबर या दरम्यान सुमारे सात हजार हेक्‍टरवर केळी बागांची लागवड झाली आहे. या बागांची वाढ मार्चपर्यंत चांगली होती. परंतु मागील १५ ते १८ दिवसांपासून कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. यामुळे केळीचे पोंगे, वरच्या भागातील कोवळी पाने उष्णतेत होरपळत आहेत. बागांची वाढ खुंटली आहे. 

बागांभोवती नैसर्गिक वारा अवरोधक असतानादेखील कोवळ्या पानांना उष्णतेचा फटका बसत आहे. सध्या सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत उष्णता असते. रात्री आठ ते नऊ पर्यंत उष्ण वाऱ्याच्या झळा बसतात. यामुळे केळी पिकाच्या सिंचनासंबंधी शेतकरी धावपळ करून व्यवस्थापन करीत आहेत. यात मध्येच वीज बंद होणे, कृषिपंप नादुरुस्त होणे, अशा समस्यादेखील येत असून, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

ऑक्‍टोबर ते डिसेंबरमध्ये लागवडीच्या केळी बागा जळगावमधील चोपडा, जामनेर, जळगाव, पाचोरा या भागात अधिक आहेत. तसेच धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागातही या बागांची लागवड झाली आहे. या दरम्यान लागवडीच्या बागांची उंची पाच ते सहा फुटांपर्यंत आहे. केळी लागवडीसाठी खर्चही यंदा अधिक आला आहे. अशात उष्णतेमुळे नुकसान वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यंदा उष्णता या महिन्याच्या मध्यानंतर वाढली. डिसेंबरमध्ये लागवडीच्या बागा अधिक होरपळत आहेत. त्यांचे नुकसान टाळणे शक्‍य नाही. कारण उष्णतेत सिंचन वाढविले तरी तापमान फारसे नियंत्रित होत नाही.  - दीपक पाटील,  शेतकरी, माचला, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com