agriculture news in marathi, khandesh faces fodder crises for animals | Agrowon

खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी आतापासूनच टंचाई निर्माण होत आहे. रोज चार हजार ४०० मेट्रिक टनांपर्यंतचा चारा आवश्‍यक असून, टंचाई आहे. महागडा चारा विकत घेणे लहान पशुधनपालक, दुग्ध उत्पादकांना शक्‍य नाही. चारानिर्मितीसाठी मोफत बियाणे, खतेवाटप करण्यात येत आहे, पण दुष्काळी भागात पाणीच नाही तर चारा उगवायचा कुठे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी आतापासूनच टंचाई निर्माण होत आहे. रोज चार हजार ४०० मेट्रिक टनांपर्यंतचा चारा आवश्‍यक असून, टंचाई आहे. महागडा चारा विकत घेणे लहान पशुधनपालक, दुग्ध उत्पादकांना शक्‍य नाही. चारानिर्मितीसाठी मोफत बियाणे, खतेवाटप करण्यात येत आहे, पण दुष्काळी भागात पाणीच नाही तर चारा उगवायचा कुठे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. 

जिल्ह्यात लहान पशुधन १ लाख ३२ हजार ४९० आहे. त्यांना प्रतिदिन ३९७ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मोठे पशुधन ६ लाख ६५ हजार ६०४ आहे. त्यांना ३ हजार ९९३ मेट्रिक टन चारा लागेल. असा एकूण ४ हजार ३९१ मेट्रिक टन चारा शेतकरी, पशुपालकांना दर दिवशी लागेल. एवढा चारा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला दमछाक करावी लागत आहे. 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४ हजार ५५६.३ हेक्‍टर क्षेत्रावर चारानिर्मिती करण्याचे नियोजन आहे. तर ८५७.१२ हेक्‍टरवर गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती होणार आहे. पशुधन पालक, शेतकऱ्यांना चारा उपलब्ध व्हावा. गावोगावी चाराटंचाईवर उपाय योजले जावेत यासाठी चारा उत्पादनाची कार्यवाही प्रशासन करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शासनाच्या आदेशान्वये अर्ज मागविण्यात आले होते. परंतु या योजनेसंबंधी आतापर्यंत केवळ १४० शेतकऱ्यांनी अर्ज पशुसंवर्धन विभागाकडे सादर केले आहेत. परंतु चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, पाचोरा व भडगावचा पश्‍चिम भाग, बोदवड, जामनेरात पाणीटंचाई वाढली आहे. शेतकऱ्यांकडे पाणीच नाही. मग या योजनेत सहभाग घेऊन काय फायदा, चारा उगविणार कसा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. चारा दावणीला उपलब्ध करा. जेथे बागायती आहे, त्या भागात ही योजना सक्तीने राबवून चारा दुष्काळी तालुक्‍यांमध्ये आणा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

कृषी विभागालाही शासनाकडून आलेले मोफत बियाणे शेतकऱ्यांना बियाणे वाटण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना चारा लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय झालेला होता. मात्र अद्यापही अशा जागांचा शोध घेण्यात आला नाही. योजनेंतर्गत वैरण पीक घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी यासाठी ५५ लाखांची खर्चाची तरतूद आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांची १० गुंठे जमीन आहे, सिंचनाची सुविधा आहे, अशांना चारा पिके घेण्यासाठी शासनातर्फे मोफत बियाणे, खतांचा पुरवठा केला जाणार आहे. कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील १२ हजार ४१३ शेतकऱ्यांना २५ हजार ८०० किलो चारा बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...