खानदेशातील शेतकरी कांद्याला योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत

खानदेशातील शेतकरी कांद्याला योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत
खानदेशातील शेतकरी कांद्याला योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक स्थिर आहे. जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सोमवारी (ता. ८) किमान २५०, तर कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर  लाल कांद्यास मिळाले. शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची प्रतीक्षा आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील बाजारात कमी, तर धुळे बाजारात मात्र प्रतिदिन ५०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. तेथेही दर किमान २५०, कमाल ७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. आवक शिंदखेडा, धुळे भागातून होत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६०० क्विंटल सरासरी आवक मागील आठवड्यात झाली.

नगर, सोयगाव (जि. औरंगाबाद), जालना, यावल, जळगाव, पाचोरा भागातून तेथे आवक होत आहे. चाळीसगाव येथील बाजारातही आवक स्थिर आहे. प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंतची आवक झाली. बाजारात कांदा लिलावासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. पुढे रोज लिलाव होतील, अशी माहिती मिळाली. 

चोपडा तालुक्‍यातील अडावद येथील उपबाजारात प्रतिदिन ३०० क्विंटल, तर यावल तालुक्‍यातील किनगाव येथील उपबाजारात प्रतिदिन २०० क्विंटल आवक झाली. तेथेही कमाल दर ७५० रुपयांपेक्षा अधिक नाहीत. दर्जेदार कांद्याची आवक चाळीसगाव, चोपडा व यावल येथील बाजारांमध्ये होत आहे. सध्या कांदा उत्पादनासाठी खानदेशात प्रसिद्ध असलेल्या धुळे, चाळीसगाव, यावल, चोपडा, जळगाव, साक्री भागांत काढणी सुरू आहे. अनेक शेतकरी योग्य दरांच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात कांद्याची साठवणूक केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com