agriculture news in marathi In Khandesh, farmers are being pushed for recovery of electricity bills | Agrowon

खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी वाढल्याचे कारण सांगून महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावला जात आहे.

जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी वाढल्याचे कारण सांगून महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावला जात आहे.

दुसरीकडे सत्ताधारी मंडळीने कृषिपंप वीजबिल माफीची घोषणा केली होती, तिची अंमलबजावणी करा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यात वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरूच राहील, असा इशारा महावितरणकडून दिला जात आहे. 

वीजपुरवठा गेले अनेक वर्षे सुरळीत नाही. चार दिवस दिवसा सहा ते सात तास वीजपुरवठा कृषिपंपांना सर्वत्र केला जातो. रात्री दोन दिवस वीजपुरवठा केला जातो. एक दिवस वीज बंद असते. आठवड्यात सहा दिवस जेमतेम वीजपुरवठा सुरू असतो. त्यात वीज यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. शेतकऱ्यांना निधी संकलन करून खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने रोहित्र व फ्युजपेट्यांची दुरुस्ती करावी लागते. असे असताना देखील महावितरणकडून कृषिपंपांसाठी अव्वाच्या सव्वा वीजबिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. यामुळे थकबाकी वाढल्याचे दिसत आहे.

हे आकडे फुगविले आहेत. हे अवाजवी बील भरणार कसे, शासनाने आपल्या वीजबिल माफीच्या घोषणेची पूर्तता करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 
महावितरणचे कर्मचारी कुठलीही सूचना न देता एका गावात किंवा परिसरात सर्वच शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कारण ऊन तापत आहे. मका, केळी, भाजीपाला, संकरित ज्वारी पिकाला सिंचन करावे लागत आहे. गहू पिकाला देखील अनेक भागात दोनदा सिंचन करावे लागणार आहे. 

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनेकदा आपल्या भाषणात महावितरणकडून खंडित होणारा कृषिपंपांचा वीजपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविली आहे. आता वीजबिल वसुली मोहीम तत्काळ थांबविण्याचे आदेश महावितरणला पालकमंत्री पाटील यांनी द्यावेत, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...