Agriculture news in Marathi Khandesh grew cold; Rabbi expected to benefit | Agrowon

खानदेशात थंडी वाढली; रब्बीला लाभ अपेक्षित

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 डिसेंबर 2020

खानदेशात किमान तापमान ९ अंश सेल्सीअसखाली आले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

जळगाव ः खानदेशात किमान तापमान ९ अंश सेल्सीअसखाली आले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

गेले दोन-तीन दिवस थंडी कमी अधिक झाली. परंतु सोमवारी (ता. २८) रात्री वातावरणात चांगलाच गारठा तयार झाला. सायंकाळपासून गार वारे सुटले. यानंतर मध्यरात्री किमान तापमान ९ अंश सेल्सीअस खाली पोचले. या मोसमात प्रथमच किमान तापमान ९ अंश सेल्सीअसपेक्षा कमी असल्याची नोंद जळगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे हवामान केंद्र, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली.

यंदा थंडी सुरवातीपासून कमी अधिक आहे. हुडहुडी भरविणारी थंडी यंदा नसल्याने कोरडवाहू रब्बी पिकांचे नुकसान होईल, अशी स्थिती तयार झाली. अनेकदा ढगाळ वातावरण तयार झाले. मध्यंतरी १२ दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये हरभरा पिकात फवारण्या घ्याव्या लागल्या.

प्रतिकूल स्थितीत दादर ज्वारीवरही चिकटा रोगाची समस्या दिसत होती. एेन वाढीच्या वेळेस थंडीची प्रतीक्षा होती. परंतु गेल्या आठवड्याच्या मध्यापासून थंडी पडत आहे. पण थंडी कमी अधिक, अशी होती. किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सीअस यादरम्यान होते. सोमवारी मध्यरात्री मात्र चांगलाच गारठा पसरला. यामुळे रब्बी पिके जोमात येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

थंडी वाढेल किंवा कायम राहील, हे लक्षात घेता अनेक केळी उत्पादकांनी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तसेच हरभरा पिकाचे सिंचन करून घेण्याचीदेखील लगबग सुरू आहे. दादर ज्वारी पिकात दाणे पक्व होत आहेत. या पिकालाही थंडीचा लाभ होईल, असे दिसत आहे.

थंडी यंदा कमी आहे. परंतु आता थंडी पडत असल्याने रब्बी पिकांना बऱ्यापैकी लाभ होईल, असे दिसत आहे. थंडी असल्यास मका, ज्वारी पिकात सिंचनाची गरजही कमी असणार आहे.
- रमेश पाटील, शेतकरी, चोपडा, जि. जळगाव


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...