Agriculture news in marathi; Khandesh has five rains in June and only 7 days in July | Agrowon

खानदेशात जूनमध्ये पाच, जुलैमध्ये केवळ १३ दिवस पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशात जूनमध्ये सात तर जुलैमध्ये १३ दिवस पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाची सरासरी वाढली असून, सर्वत्र भिज पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तापी वगळता इतर नद्यांना पूर आलेला नसला तरी जुलै महिना पावसाच्या दृष्टीने दिलासादायक ठरला आहे. 

जळगाव ः खानदेशात जूनमध्ये सात तर जुलैमध्ये १३ दिवस पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाची सरासरी वाढली असून, सर्वत्र भिज पाऊस झाल्याने पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तापी वगळता इतर नद्यांना पूर आलेला नसला तरी जुलै महिना पावसाच्या दृष्टीने दिलासादायक ठरला आहे. 

जुलैमध्ये काही दिवस पाच मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे हे दिवस पावसाच्या दिवसांमधून वगळले आहेत. २० ते २३ जुलैदरम्यान खानदेशात फक्त चाळीसगाव व अमळनेरमधील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तर अक्कलकुवा व धडगावमधील सातपुडा पर्वताच्या भागातही अतिवृष्टी होऊन तेथील नद्या, नाल्यांना पूर आले. तापी नदीला पूर आल्याने मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, शहादा, नंदुरबार भागाला लाभ होणार आहे. परंतु गिरणा, वाघूर, अंजनी, मोर, भोकरी, पांझरा आदी नद्यांना पूर आले नाहीत. खानदेशात सरासरीच्या ४२ टक्के पाऊस झाला आहे. 

खानदेशात मागील २४ तासात कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. सर्वत्र भिज पाऊस झाला. पावसाची संततधार गुरुवारी (ता. १) पहाटेपर्यंत सुरू होती. वाफसा स्थिती नसल्याने शेतीकामे ठप्प आहेत. तणनियंत्रण, फवारण्या, खते देणे, आंतरमशागत बंदावस्थेत आहे. भिज पावसाने पिकांची वाढ होत असली तरी हलक्‍या, मध्यम जमिनींमध्ये तण वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत गत २४ तासात झालेला पाऊस (मिलिमीटर) ः  जळगाव जिल्हा ः जळगाव १८, धरणगाव १७, एरंडोल २०, पाचोरा १७, चाळीसगाव २१, जामनेर २३, बोदवड १०, रावेर १८, चोपडा १४. धुळे जिल्हा ः शिरपूर १७, धुळे १८, साक्रीत १७. नंदुरबार जिल्ह्यात ः शहादा १६, तळोदा २१, नवापूर २१, नंदुरबार २१. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...