Agriculture news in marathi, In Khandesh, heavy rains hit the onion crop hard | Page 4 ||| Agrowon

खानदेशात अतिपावसाचा कांदा पिकाला मोठा दणका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

जळगाव : खानदेशात अतिपावसाने कांदा पिकाची अतोनात हानी झाली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी किडनाशके, बुरशीनाशकांचा वापर करीत आहेत. तसेच पिकवाढीसाठी आवश्यक खतेही देत आहेत. यामुळे कांदा उत्पादकांचा खर्च वाढला आहे. एकरी २० ते २२ हजार रुपये खर्च यंदा येईल, अशी स्थिती आहे. 

जळगाव : खानदेशात अतिपावसाने कांदा पिकाची अतोनात हानी झाली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी किडनाशके, बुरशीनाशकांचा वापर करीत आहेत. तसेच पिकवाढीसाठी आवश्यक खतेही देत आहेत. यामुळे कांदा उत्पादकांचा खर्च वाढला आहे. एकरी २० ते २२ हजार रुपये खर्च यंदा येईल, अशी स्थिती आहे. 

कारण यंदा बियाणे महाग होते. एकरी तीन ते चार किलो बियाणे लागले. १२००, १५०० व २८०० रुपये प्रतिकिलो एवढे दर कांदा बियाण्याचे होते. तणनियंत्रण, लागवड, कांदा रोपवाटिकांमधील किडनाशके, बुरशीनाशकांचा खर्च यंदा अधिक झाला आहे. लागवड खानदेशात सुमारे १२ हजार हेक्टरवर झाली आहे.

पीकस्थिती मध्यंतरी बरी होती. परंतु ऑगस्टमधील अतिपावसात अनेक भागात पिकाचे नुकसान झाले आहे. किडींचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. मर रोगही वाढला आहे. जेथे पाणी वाहून नेणारे मार्ग व्यवस्थित नाहीत, त्या क्षेत्रात समस्या अधिक आहे. एक एकर क्षेत्रात २० ते ३० टक्के कांदा पिकाची हानी अतिपावसाने झाली आहे. 

रसशोषक किडींचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. यामुळे किडनाशके, बुरशीनाशके दर १० ते १२ दिवसात शेतकरी फवारत आहेत. दोनदा रासायनिक खतेही पिकाला दिली आहेत. यामुळे उत्पादन खर्च सतत वाढत आहे. मध्यंतरी पावसाचा ताण होता. त्या वेळेसही पीक पिवळसर दिसत होते. आता अतिपावसात पीक पिवळसर दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात अतिपावसाने हानी झाल्याची माहिती मिळाली. 
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...