agriculture news in marathi, khandesh loksabha election, jalgaon, maharashtra | Page 2 ||| Agrowon

जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार दुहेरी लढत 
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 26 मार्च 2019

जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व जळगावातील लोकसभा निवडणुकीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, या तिन्ही मतदारसंघांमध्ये दुहेरी लढत होईल. शिवसेना-भाजपची युती असली तरी जळगाव, रावेर व धुळ्यात युतीधर्म पाळला जाईल काय, असा मुद्दा चर्चेत आहे. 

जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व जळगावातील लोकसभा निवडणुकीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, या तिन्ही मतदारसंघांमध्ये दुहेरी लढत होईल. शिवसेना-भाजपची युती असली तरी जळगाव, रावेर व धुळ्यात युतीधर्म पाळला जाईल काय, असा मुद्दा चर्चेत आहे. 

शिवसेना-भाजपमधील वाद मागील पाच वर्षांत विकोपाला गेले. भाजपचे नेते एकनाथ खडसे व सेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगत राहिला. जिल्हा परिषदेत मागील तीन पंचवार्षिक भाजपने शिवसेनेला सोबत घेतले, परंतु या पंचवार्षिकमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. एका सदस्याचा पाठिंबा भाजपला हवा होता, त्यासाठी भाजपने काँग्रेसची मदत घेतली. शिवाय काँग्रेसच्या सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपदही दिले. यामुळे भाजपविषयी ग्रामीण भागात नाराजी वाढली.

काही दिवसांपूर्वी सेनेच्या जि. प. सदस्यांनी भाजपसाठी मते मागायला आम्ही कसे जाऊ, जिल्हा परिषदेत एकमेकांना विरोध व मते मागण्यासाठी एकत्र फिरता, जनता आम्हाला जाब विचारेल, असे जाहीरपणे सांगून भाजपला मदत न करण्याचे संकेत दिले. शिवसेना नेते सुरेश जैन हे तूर्ततरी राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. पालिकेत सत्ता गमावल्याने जैन गटाला धक्का देत भाजपने सत्ता मिळविली. जळगाव शहर जळगाव लोकसभा मतदारसंघात निर्णायक आहे. आता जैन गटाची भूमिका काय, ते भाजपला मदत करतील का, हा प्रश्न असून मने दुभंगल्याचे कारण राजकीय जाणकार सांगत आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळाली आहे. देवकर हे मागील विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी होते. देवकर लोकसभेत पोचले तर पुढे गुलाबराव पाटील यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत ताकदवान उमेदवार नसणार, यामुळे गुलाबराव पाटील यांचा पुढचा राजकीय मार्ग सुकर करण्यासाठी जळगावमधील सेनेचा एक गट आपली ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकर यांच्या पाठीशी उभी करण्याची तयारी करीत असल्याचे चर्चिले जात आहे.

रावेरातही शिवसेना व भाजपमध्ये एकी नाही. शिवसेनेचे रावेर भागाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात राजकीय वैर आहे. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढत दिली होती. आता लोकसभेत खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांना सेनेची मदत मिळेल, असे कुणीही दाव्याने सांगू शकत नाही.

धुळ्यातही सेना व भाजपमध्ये सौख्य नाही. शिवसेना नेते शरद पाटील व धुळे भाजपमधील एका गटात अंतर्गत कलह आहेत. नंदुरबारात सेनेने भाजपला मदत करण्यासंबंधी आश्‍वासन दिले आहे, परंतु तेथेही सेना एकदिलाने भाजपसोबत राहील का, असा प्रश्‍न आहे. 

अशा आहेत लढती
भाजपने खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव व रावेर या चार मतदारसंघांमध्ये जळगावात स्मिता वाघ, रावेरात रक्षा खडसे व नंदुरबारात डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. तीन महिला उमेदवार प्रथमच भाजपने रिंगणात उतरविल्या आहेत. आघाडीमध्ये रावेरची जागा काँग्रेसला सुटेल, असे दावे केले जात आहेत, परंतु उमेदवार जाहीर झालेला नाही. नंदुरबारमध्ये काँग्रेसने आमदार के. सी. पाडवी, धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील, तर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटकाजम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...